सरकारी शाळा
------------------
गावात सरकारी शाळा
उघडली
गावकरी जाम खुश
झाले
शाळेत पोरांची नावं दाखल
करण्याचे
काहीच पैसे लागणार नव्हते
पुस्तकं,
गणवेश,
दुपारचे जेवण
सगळं काही मोफत
मिळणार होते
तीन खोल्यांची शाळा
दोन खोल्या आणि
एक स्वच्छतागृह
मुख्याध्यापिका,
शिक्षक आणि
सेविका
सरपंचांनी उंबरठ्यावर
नारळ फोडला
दोनचार जणांनी मिळून
राष्ट्रगीताची मोडतोड केली
सोमवारपासून शाळा सुरु
झाली
आधी झाली सरस्वती वंदना
विसरले,
राष्ट्रगीताने सुरुवात करायची
असते ते
शिक्षक जेव्हा वर्गात आले
रजिस्टरमध्ये नाव
लिहीण्याआधी
दुर्गंधीने खवळून उठले
पोरांवर खेकसले,
जरा लांब जावून बसा..
मी ज्याला जे काम देत आहे
ते लक्षपूर्वक करायचं आहे
नाहीतर त्यादिवशी जेवण नाही
रजिस्टरात नावं लिहीली
अन् कामं
सांगितली
रेखा,
सीमा,
नजमा,
तुम्ही मोठ्या आहात
तुम्ही स्वयंपाकासाठी चंपा (सेविका)
ला मदत करायची,
झाडू मारणे आणि
भांडी घासणे
अहमद,बिरजू गावातून दूध
आणणे
कमली,गंगू
मागे संडास आहे
मैला उचलणे आणि
लांबवर शेतात
टाकून येणे
तुम्ही पोरांनो इकडं बघा,
लहान आहात
पण,
उद्यापासून पूर्ण
कपडे घालून
या बरं..!
एका सूरात
सगळे म्हणा,
अ पासून अननस..!
आ पासून आंबा...!
जेवण तयार झाले
आणि आधी
सरपंचाच्या घरी गेले
मग शिक्षकांच्या पोटामध्ये
पोरांच्या वाट्याला उरलेसुरले
दिवस सरत चाललेले
रेखा,
नजमा यांची लग्नं झाली
आता दुसर्या मुली झाडू मारतात
अहमद,
बिरजू यांना अजूनही
अननस आणि
आंब्याची आस आहे
कमली,
गंगू मैला वाहून नेतात
शेतावरुन येऊन
जेवण करतात
कधी उपाशीच
घरी परततात
बारकी पोरं अजूनही
भोंगळीच आहेत
लपून बर्याचदा भांडी
चाटत असतात
कुणी बघितलं की
पळून जातात
चंपा मुख्याध्यापिकेच्या
घरी राबतेय,
काहीशी अशा पध्दतीने
गावातली शाळा सुरु आहे!
---------------------------
हिंदी कविता
शाहनाज इमरानी
मराठी रुपांतर
भरत यादव
साभारः
पहल
------------------
गावात सरकारी शाळा
उघडली
गावकरी जाम खुश
झाले
शाळेत पोरांची नावं दाखल
करण्याचे
काहीच पैसे लागणार नव्हते
पुस्तकं,
गणवेश,
दुपारचे जेवण
सगळं काही मोफत
मिळणार होते
तीन खोल्यांची शाळा
दोन खोल्या आणि
एक स्वच्छतागृह
मुख्याध्यापिका,
शिक्षक आणि
सेविका
सरपंचांनी उंबरठ्यावर
नारळ फोडला
दोनचार जणांनी मिळून
राष्ट्रगीताची मोडतोड केली
सोमवारपासून शाळा सुरु
झाली
आधी झाली सरस्वती वंदना
विसरले,
राष्ट्रगीताने सुरुवात करायची
असते ते
शिक्षक जेव्हा वर्गात आले
रजिस्टरमध्ये नाव
लिहीण्याआधी
दुर्गंधीने खवळून उठले
पोरांवर खेकसले,
जरा लांब जावून बसा..
मी ज्याला जे काम देत आहे
ते लक्षपूर्वक करायचं आहे
नाहीतर त्यादिवशी जेवण नाही
रजिस्टरात नावं लिहीली
अन् कामं
सांगितली
रेखा,
सीमा,
नजमा,
तुम्ही मोठ्या आहात
तुम्ही स्वयंपाकासाठी चंपा (सेविका)
ला मदत करायची,
झाडू मारणे आणि
भांडी घासणे
अहमद,बिरजू गावातून दूध
आणणे
कमली,गंगू
मागे संडास आहे
मैला उचलणे आणि
लांबवर शेतात
टाकून येणे
तुम्ही पोरांनो इकडं बघा,
लहान आहात
पण,
उद्यापासून पूर्ण
कपडे घालून
या बरं..!
एका सूरात
सगळे म्हणा,
अ पासून अननस..!
आ पासून आंबा...!
जेवण तयार झाले
आणि आधी
सरपंचाच्या घरी गेले
मग शिक्षकांच्या पोटामध्ये
पोरांच्या वाट्याला उरलेसुरले
दिवस सरत चाललेले
रेखा,
नजमा यांची लग्नं झाली
आता दुसर्या मुली झाडू मारतात
अहमद,
बिरजू यांना अजूनही
अननस आणि
आंब्याची आस आहे
कमली,
गंगू मैला वाहून नेतात
शेतावरुन येऊन
जेवण करतात
कधी उपाशीच
घरी परततात
बारकी पोरं अजूनही
भोंगळीच आहेत
लपून बर्याचदा भांडी
चाटत असतात
कुणी बघितलं की
पळून जातात
चंपा मुख्याध्यापिकेच्या
घरी राबतेय,
काहीशी अशा पध्दतीने
गावातली शाळा सुरु आहे!
---------------------------
हिंदी कविता
शाहनाज इमरानी
मराठी रुपांतर
भरत यादव
साभारः
पहल