माझं तिबेटीपण
-------------------
एकोणचाळीस वर्षांपासून
निर्वासित,
तरिही कुठलाच देश
आमच्याबरोबर नाही,
हाय रे दैवा,एकही नाही!
आम्ही लोक इथे शरणार्थी
आहोत,
एका बेपत्ता देशाचे लोक,
जे कुठल्याही देशाचे नागरिक
नाहीत
दुनियेच्या करुणेस पात्र
प्रशांत भिक्खु
उत्साही,उत्सुक परंपरावादी;
सारेच्या सारे समाविष्ट करताना
संस्कृतींच्या वर्चस्वाखाली हरवलेले,
एक लाख आणि कित्येक हजार लोक
मी,
प्रत्येक नाक्यावर आणि कार्यालयात
एक 'भारतीय तिबेटी' आहे,
दरवर्षी नूतनीकरण करत आलेला
आपल्या नागरीकत्व प्रमाणपत्राचे,
एका सलामासहित
भारतात जन्मलेला एक विदेशी
मी तिबेटी चंकी चेहरामोहरा असूनही
काहीसा अधिकच भारतीय
नेपाळी?थाई?जपानी?
चिनी?नागा?मणिपुरी?
पण,
फक्त तिबेटी?
हा प्रश्न कधीच नाही!
मी एक तिबेटी,
जो तिबेटमधून आलेला नाही,
कधी तिथे गेला नाही,
तरिही तेथेच मरु शकण्याचे
स्वप्न पाहतो आहे!
------------------------
मूळ तिबेटी कविता
तेनजी सुन्डू
हिंदी अनुवाद
अनुराधा सिंह
मराठी रुपांतर
भरत यादव
प्रस्तुत चित्र साभारः
तेनजी सुन्डू यांच्या फेसबुक प्रोफाइलवरुन