लघु नाटिका
असगर वजाहत
~~~~~~~~
- नवा कायदा का बरं
आवश्यक आहे?
- देशात घुसखोर घूसलेयत,
त्यांना हाकलणं गरजेचं आहे.
- अगदी बरोब्बर,पण घुसखोर सीमा ओलांडून आले आहेत का?
- हो ना,
सीमा ओलांडूनच आले आहेत.
- आपल्या सीमांवर सुरक्षा नाहीए का?
- सुरक्षा आहे,
परंतू तरिपण ते घूसले आहेत.
- सुरक्षादलाचे काम घुसखोरांना रोखणे हे होते,
ते त्यांना का रोखू शकले नाहीत?त्यांच्याकडून काही जाब-जबाब मागवलाय का?
- नाही मागवला,लोकशाहीत सुरक्षादलांची चौकशी करण्याची पध्दत नाहीये.
- किती घुसखोर आले आहेत?
- याचाही काही अंदाज लावला गेलेला नाहीए.
- घुसखोरांचा देशाला नेमका
कोणता उपद्रव आहे?
- घुसखोरांनी देशातील सगळ्या नोकर्या बळकावल्यात,त्यामुळे बेकारी वाढलीये.
- आणखी?
- घुसखोरांनी शैक्षणिक संस्थांमध्ये इतकी घुसखोरी केलीये की त्यामुळे शिक्षणसंस्था उद्धवस्त झाल्या आहेत.
- आणखी?
- हाॅस्पिटलांमध्ये घुसखोरांवरच इलाज सुरु आहे परिणामी देशवासियांवर इलाज होणे शक्य नाहीए.
- अजून?
- घुसखोरांनी देशाचे सगळे पाणी पिऊन टाकलेय.
- आणि?
- घुसखोर बलात्कारसुध्दा करतायेत,त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत.
- आणखी?
- घुसखोर बाजारात खरेदीही चिक्कार करतायेत या कारणामुळे महागाई पण वाढलीये!
- अजून?
- आणखी बर्याच गोष्टी आहेत,सगळ्या समस्यांचे मूळ हे घुसखोर आहेत,त्यांना कुठल्या ना कुठल्या तर्हेने देशाबाहेर काढावेच लागेल,जोवर इथं घुसखोर आहेत,
तोवर देशाची प्रगती शक्य नाहीए!
- फार उत्तम विचार आहेत.चांगलं काम करताय,पण त्यांना बाहेर काढणार कसं?
- संपूर्ण देशाला-हरेक नागरीकाला हे सिध्द करावे लागेल की ते घुसखोर नाहीयेत म्हणून.
- याचा अर्थ असा की, एक चोर पकडण्यासाठी गाव-शहरातल्या सगळ्या लोकांना हे सिध्द करावे लागेल की ते चोर नाहीयेत म्हणून?
- होय,
उत्तम प्रशासनाची हीच तर ओळख आहे !!
-------------------------------------------
मूळ हिंदी लघु नाटिका
असग़र वजाहत
मराठी अनुवाद
भरत यादव