मी भारताचा मुसलमान आहे
/ भरत प्रसाद
----------------------------------
जेव्हा तु किंचाळतोस की,
'इस्लामचा अर्थ दाढीवाला
मुसलमान' (तेव्हा)
माझ्या अंतरात्म्यातून रक्त
वाहायला लागते
जेव्हा तुला माझ्या भाषेतून
धार्मिक वास येऊ लागतो
त्याचक्षणी कापली जाते माझी जीभ
रोम-रोमात मरण भरुन राहाते
शतकांपासून संशय घेण्याचे तुला
वेड आहे न!
ये,
चामडी सोलून काढ पापुद्र्यांमधून
जागोजागी भारतवर्ष!
भारतवर्ष!
निर्झराप्रमाणे वाहात असल्याचे
ऐकू येईल
म्हणायला मुसलमान आहे मी
पण उभा राहीन भारतीयत्वाच्या
रक्षणासाठी
कुठल्याही हिंदू-शिख-ख्रिस्ती
किंवा बौध्दाप्रमाणे
तळहातावर प्राण घेऊन-देऊन
तु विचारतोयस,
कुठला आहे माझा देश!
अरे,
नकळतपणे कधीपासून मिसळून
गेलेयत प्राण या
भूप्रदेशाच्या वातावरणामध्ये
काहीही करुन टाक,
म्हणून टाक
नाही करु शकणार वेगळा
माझ्या रक्ताचा अस्सल सुगंध
या देशाच्या मातीमधून!
आपल्या धर्मखोर नजरेने
माझे मुसलमान असणे
जोखू नकोस
हे जे पुनःपून्हा आमच्या
अस्तित्वावर
कट्टरतेचे रंग उधळतोयस
जरा विचार कर,
स्वतः किती रुतला आहेस
रक्ताच्या दलदलीत!
सांगू इच्छितोय आज
आरशात पाहून घे एकदा,
तेव्हा स्वतःच्या नजरेला नजर
भिडवू शकणार नाहीस!
---------------------------------------
मूळ हिंदी कविता
भरत प्रसाद
मराठी अनुवाद
भरत यादव
/ भरत प्रसाद
----------------------------------
जेव्हा तु किंचाळतोस की,
'इस्लामचा अर्थ दाढीवाला
मुसलमान' (तेव्हा)
माझ्या अंतरात्म्यातून रक्त
वाहायला लागते
जेव्हा तुला माझ्या भाषेतून
धार्मिक वास येऊ लागतो
त्याचक्षणी कापली जाते माझी जीभ
रोम-रोमात मरण भरुन राहाते
शतकांपासून संशय घेण्याचे तुला
वेड आहे न!
ये,
चामडी सोलून काढ पापुद्र्यांमधून
जागोजागी भारतवर्ष!
भारतवर्ष!
निर्झराप्रमाणे वाहात असल्याचे
ऐकू येईल
म्हणायला मुसलमान आहे मी
पण उभा राहीन भारतीयत्वाच्या
रक्षणासाठी
कुठल्याही हिंदू-शिख-ख्रिस्ती
किंवा बौध्दाप्रमाणे
तळहातावर प्राण घेऊन-देऊन
तु विचारतोयस,
कुठला आहे माझा देश!
अरे,
नकळतपणे कधीपासून मिसळून
गेलेयत प्राण या
भूप्रदेशाच्या वातावरणामध्ये
काहीही करुन टाक,
म्हणून टाक
नाही करु शकणार वेगळा
माझ्या रक्ताचा अस्सल सुगंध
या देशाच्या मातीमधून!
आपल्या धर्मखोर नजरेने
माझे मुसलमान असणे
जोखू नकोस
हे जे पुनःपून्हा आमच्या
अस्तित्वावर
कट्टरतेचे रंग उधळतोयस
जरा विचार कर,
स्वतः किती रुतला आहेस
रक्ताच्या दलदलीत!
सांगू इच्छितोय आज
आरशात पाहून घे एकदा,
तेव्हा स्वतःच्या नजरेला नजर
भिडवू शकणार नाहीस!
---------------------------------------
मूळ हिंदी कविता
भरत प्रसाद
मराठी अनुवाद
भरत यादव