निसर्गाचं महत्त्व! ( कविता )

निसर्गाचं महत्त्व! ( कविता )


 निसर्गाचं महत्त्व!

/ लीमा तुती

🍁

तुम्ही आम्हाला जंगली म्हटलं

तुम्ही आम्हाला असभ्य म्हटलं

तुम्ही आम्हाला मुर्ख आणि 

जनावर सुद्धा म्हटलंत

आणि आम्ही...

हसत राहिलो

आणि हसत हसत आम्ही,

वाचवत राहिलो...

जंगलं,नद्या आणि हिरवळ

वाचवत राहिलो,

पाखरं,प्राणी आणि त्यांना 

मोहीत करण्याचे ज्ञान

वाचवत राहिलो,

संगीत,संस्कृती आणि कला

आणि वाचवत राहिलो...

डोंगराच्या अल्याड

एक मऊ-मुलायम 

आणि सुपीक धरती

वाचवलीये आम्ही सहजता-सरळता

वाचवलाय आम्ही साधेपणा 

आणि मनस्वी बेफिकीरपणा

मग तुम्ही....आम्ही वाचवलेल्या गोष्टींची 

छायाचित्रं छापून जगाला

सांगितलंत.....'निसर्गाचं महत्त्व!' 

🍁

मराठी अनुवाद

भरत यादव

Bharat Yadav 

🍁

मूळ हिंदी कविता

तुमने हमें जंगली कहा

तुमने हमें असभ्य कहा

तुमने हमें बेवकूफ और जानवर तक कहा

और हम...

मुस्कुराते रहे

और मुस्कुराते हुए हम, बचाते रहे...

 जंगल, नदियाँ और हरियाली,

बचाते रहे, परिंदे जानवर और उन्हें रीझाने का गुर,

बचाते रहे.. संगीत संस्कृति और कलाएँ

और बचाते रहे... पहाड़ के इस तरफ

एक नम, मुलायम और उपजाऊ धरती,

बचाया हमने.. सहजता, सरलता, सादगी और 

मस्तमौलापन...

फिर तुमने... हमारी बचायी चीजों की तस्वीरें छापकर

दुनिया को बताया.... 

'प्रकृति का महत्व'

🍁

©लीमा तुती

    Lima Tuti                                              

🍁🍁🍁

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने