माणूस आणि स्वातंत्र्य
/ शकील प्रेम
🍁
जेव्हा तुम्ही
वंशाच्या आधारे
स्वतःला गौरविण्यास
प्रारंभ करता
तेव्हा तुम्ही
मानवता सोडून
एखाद्या वंशवादी झुंडीत सहभागी झालेले असता,
जेव्हा तुम्ही
आपल्या जातीअभिमानाचा
दर्प मिरविण्यास सुरूवात करता
तेव्हा तुम्ही मानवतेचा परीघ उल्लंघून
जनावरांच्या झुंडीत सहभागी झालेले असता
जेव्हा तुम्ही
देशाच्या नावावर
आपल्या श्रेष्ठत्वाचे ढोंग रचत असता
तेव्हा तुम्ही
संवेदना सोडून एका
निष्ठुर झुंडीचा भाग बनून जाता
जेव्हा तुम्ही धर्माच्या नावावर
स्वश्रेष्ठत्वाचे ढोंग वठवत असता
तेव्हा तुम्ही माणूस असल्याची ओळख गमावून एखाद्या रोगट झुंडीत सहभागी झालेले असता
लक्षपूर्वक
स्वतःच्या मानसिकतेला
चाचपून पाहा
वर्ण वंश जात प्रांत भाषा
राष्ट्र आणि धर्माच्या नावावर
तुम्हीही
कुठल्या ना कुठल्यातरी
झुंडीत सामिल असलेले आढळून याल
जगभरातल्या सर्व सामाजिक समस्या
या तुमच्या आणि माझ्याकडून
झुंडी तयार केल्या गेल्यामुळेच सुरू झाल्यात
आणि राजकीय पटसुद्धा
झुंडीत अडकलेला मनुष्य
जनावर बनतो
जनावर बनलं की
तो आपल्या झुंडीबद्दल
गर्व व्यक्त करायला करतो
स्वतःसाठी बनविलेल्या सापळ्याचा दुराभिमान बाळगू लागतो
आणि अखेरीस गळ्यातले दोर
आणि घंटा यांवरची भक्तीच त्याचं
आयुष्य बनून जातं
एवढेच नव्हे
झुंडीबाहेरचं जग त्याचं शत्रू बनतं
आणि त्याला हाकणारा मेंढपाळ
त्याचा हितचिंतक बनतो
माणूस
फक्त माणूस होऊन जगला तरच
माणसाचे माणूसपण टिकून राहील
आणि स्वातंत्र्यदेखील
झुंडी तयार होताच
माणूस आपले स्वातंत्र्य गमावून बसतो आणि माणूसपणसुद्धा
स्वातंत्र्याचा
खराखुरा अर्थ म्हणजे
झुंडीच्या बाहेर पडणे हाच तर आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जब आप
नस्ल के आधार पर
खुद को
गौरवान्वित करना शुरू करते हैं
तब आप
इंसानियत छोड़ कर
किसी नस्लवादी
झुंड में शामिल हो जाते हैं,
जब आप
अपनी जाती पर
इतराना शुरू करते हैं
तब आप मनुष्यता
की परिधि लांघकर
पशुओं के झुंड में
शामिल हो जाते हैं,
जब आप
राष्ट्र के नाम पर
अपनी
महानता का ढोंग करते हैं
तब आप
संवेदनाओं से मुक्त होकर
निर्ममता के
झुंड का हिस्सा हो जाते हैं,
जब आप
धर्म के नाम पर
खुद की श्रेष्ठता का ढोंग करते हैं
तब आप
मनुष्य होने की पहचान खोकर
किसी बीमार
झुंड में शामिल हो जाते हैं,
गौर से
खुद की मानसिकता को
टटोल कर देखिए
रंग नस्ल जात क्षेत्र भाषा
राष्ट्र और मजहब के नाम पर
आप भी
किसी न किसी झुंड में
शामिल नजर आएंगे,
दुनिया की सारी
सामाजिक समस्याएं
आपके और मेरे
झुंड बनने से ही
शुरू होती हैं
और राजनीति की बिसातें भी,
झुंड में कैद इंसान
जानवर बन जाता है
जानवर बनते ही
वह अपने झुंड पर
इतराना शुरू कर देता है
खुद के लिए बनाई गई
घेराबन्दियों पर
गर्व भी करने लगता है
और आखिरकार
गले की रस्सियों और घण्टियों
पर आस्था ही जिंदगी हो जाती है
इतना ही नहीं
झुंड से बाहर की दुनिया
दुश्मन हो जाती है
और उसे हांकने वाला चरवाहा
उसका हितैषी हो जाता है.
मनुष्य
सिर्फ मनुष्य बनकर जिये
तो ही मनुष्य की
मनुष्यता कायम रहेगी
और
स्वतंत्रता भी,
झुंड बनते ही
मनुष्य अपनी
स्वतंत्रता खो देता है
और
मनुष्यता भी,
आजादी का
वास्तविक अर्थ
झुंड से
बाहर निकलना ही तो है.
©शकील प्रेम
Shakeel Prem