आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

 आजकालचे अभंग!

🚩

आता वाराणसी

तुझी आहे पाळी

सौहार्दाची होळी

पाहण्याची


घाटा-घाटांवर

लागले फतवे

धर्मखोर गवे

मस्तावले


माणसाचा नव्हे

वैरी हा माणूस

निव्वळ हा फार्स

राजकीय


निवडणुकीचे

तापविती रण

घृणेचे सरण

रचूनिया


समन्वय हाच

गुण या मातीचा

धर्म वा जातीचा

प्रश्न नाही


सत्तालोभी आता

पिसाळले फार

भाईचारा ठार

मारताती


वाढले धर्माचे

वर्चस्व फुकाचे

भट-भिक्षुकांचे

फुटे पेव


बघा महादेवा

म्हणविती भक्त

माणसाचे रक्त

स्वस्त केले


हीच मोदीशाची

देशबुडवी नीती

भारतास नेती

रसातळी


कबीराची भूमी

नासविती अशी

सत्तेसाठी काशी

घातलेली

🚩

©भरत यादव

Bharat Yadav


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने