कबीराची भूमी
/ बच्चा लाल 'उन्मेष'
तुझा आणि सूर्याचा आहे मुद्दा
इतरांच्या दिवसाची रात करू नको
जेव्हा जागी झाली दगडात भक्ती
समजून घे पुन्हा तिथे बात करू नको
एकवजनी कारण मनी धरून ये
झगडा हा असा अजिबात करू नको
समोरून ये, हिंमत देईन
मागून असा तू घात करू नको
असतील अजूनी मातीची घरं
पावसा अशी बरसात करू नको
ज्याने छळली गेलीय दुनिया
तो हत्तीचा वर दात करू नको
ही आहे कबीराची भूमी
इथे धर्म आणि जात करू नको
स्वतःलाही वेळ दे रे 'बच्चा'
जगभरात अशी वरात करू नको
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी गझल
कबीरा की माटी
है तेरा और सूरज का मसला
औरों के दिन को रात न कर।
जब जग ही गई पत्थर में आस्था
समझ की फिर वहाँ बात न कर।
एक वजनी वजह सोच के आ
झगडा यूँ बेबात न कर।
आगे से आ, हौसला दूँगा
पीछे से यूँ घात न कर।
होंगे अभी मिट्टी के घर
बादल यूँ बरसात न कर।
जिससे छली गई दुनिया
वो हाथी वाला दांत न कर।
है ये कबीरा की माटी
यहाँ धर्म और जात न कर।
खुद को भी समय दे बच्चा
दुनिया भर बारात न कर।
©बच्चा लाल 'उन्मेष'
Baccha Lal 'Unmesh'