तपास

तपास


 तपास

/ राजहंस सेठ


ज्याचे हात रिकामे होते

तो मारेकरी होता


ज्याच्या हातात बंदूक होती

तो निवांतपणे

तिची नळी साफ करीत होता


गोळी बंदूकीतून सुटली होती

जी मारली गेली ती लोकशाही होती


लोकशाहीचा मारेकरी तो होता

ज्याचे हात रिकामे होते !


मराठी अनुवाद

भरत यादव


मूळ हिंदी कविता


इन्वेस्टिगेशन 


जिसके हाथ खाली थे 

वह कातिल था 


जिसके हाथ में बंदूक थी

वह इत्मीनान से 

उसकी नली साफ कर रहा था 


गोली बंदूक से निकल चुकी थी 

जो मारा गया वह लोकतंत्र था 


लोकतंत्र का हत्यारा वह था 

जिसके हाथ खाली थे !


©राजहंस सेठ

Rajhans Seth

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने