हरभगवान चावला यांच्या सहा लघुकविता

हरभगवान चावला यांच्या सहा लघुकविता

हरभगवान चावला यांच्या

सहा लघुकविता.

प्रेम सुगंधाप्रमाणे पसरत जातं

आणि घृणा आगीप्रमाणे

सुगंध समाधान देतो

तर घृणा सत्ता.


आग आणि पाण्याची अशी मैत्री पाहिली आहे का कधी? 

की जिथे आसवे ओघळतील,तिथे आग भडकेल.


संस्कृतीच्या स्वयंघोषीत राखणदारांपासून सावध राहा,

हेच तर संस्कृतीचे खरे मारेकरी आहेत.


मारण्यात ज्यांना आनंद वाटतो

ते स्वतः मरण्यास खूप घाबरतात.


जुलूमाविरूद्ध एका व्यक्तीचा संतापदेखील कमी महत्वाचा नसतो,

पुरेसा अवश्य नसतो,या संतापाला पसरले पाहिजे कोरोनाप्रमाणे.


परिस्थिती नियंत्रणात आहे,

मनस्थिती नियंत्रणाबाहेर.

सावधान!

माणसाच्या जीभेने माणसाच्या रक्ताची चव चाखली आहे.

-----

मराठी अनुवाद

भरत यादव

Bharat Yadav

-----

मूळ हिंदी 

लघुकविता


1.


प्रेम ख़ुशबू की तरह फैलता है 

घृणा आग की तरह 

ख़ुशबू सुकून देती है, घृणा सत्ता।


2.


आग और पानी की ऐसी मित्रता देखी है कभी

कि जहाँ भी आँसू गिरें, वहीं आग लग जाए।


3.


संस्कृति के घोषित रक्षकों से बचो

यही संस्कृतियों के असल हत्यारे हैं।


4.


जिन्हें मारने में आनन्द आता है

वे ख़ुद मरने से बहुत डरते हैं।


5.


ज़ुल्म के ख़िलाफ़ एक आदमी का क्रोध भी

महत्वहीन नहीं होता, नाकाफ़ी ज़रूर होता है

इस क्रोध को फैलना चाहिए कोरोना की तरह।


6.


स्थिति नियंत्रण में है, मनःस्थिति अनियंत्रित

सावधान! आदमी की ज़ुबान ने

आदमी के ख़ून का स्वाद चख लिया है। 

---------

© हरभगवान चावला

Harbhagwan Chavala

----------

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने