एका अरबी लोकओवीचा
स्वैर मराठी अनुवाद
-----------
आपल्याकडे जशा जात्यावरच्या ओव्या प्रसिद्ध आहेत,ज्यातून स्त्रिया आपल्या मनातले विचार बिनदिक्कतपणे व्यक्त करीत आल्या आहेत,अगदी तशीच मौखिक परंपरा जगभरातील विविध संस्कृतीतील,समाजातील स्त्रीमनात नांदत आली असावी.जिवलग सखी-मैत्रिणींशी होणार्या अशा ओवी-संवादातून स्त्रिया या एकाअर्थाने आपल्या अभिव्यक्तीचे धीटपणे प्रकटीकरणच करीत असल्याचे ओव्यासदृष्य काव्यओळींमधून प्रत्ययास येते.अरबी संस्कृतीही त्यास अपवाद नव्हती हेच पुढील उदाहरणावरून दिसून येते.त्यातही विशेष म्हणजे आजची आधुनिक जगातली स्त्री देखील जो विषय मांडायला धजावू शकणार नाही,असे विषयही शेकडो वर्षांपूर्वीच्या स्त्रिया ओव्यांमधून गात होत्या,समाजापुढे मांडत होत्या,आपल्या कौटुंबिक मानसिक,शारीरिक घुसमटीला शब्दरूप देऊ पाहात होत्या.हे आजच्या काळातही विलक्षण वाटावी अशीच बाब आहे.जगभरातील कष्टकरी स्त्रियांचे भावविश्व हे अशा समान धाग्यात गुंफलेले असल्याचे या सारख्या ओव्यांमधून अधोरेखीत होत असते.
---------------
काय सांगावे कवतिक
ज्याने सुंदर काॅफीदान,
खलबत्ता तर खरीदला
पण त्यात कधी बिया
नाही कुटल्या-दळल्या
बघता बघता काळ
आठ सालाचा सरला
पुरूषाने एक तर
वस्तुंना या वापरावे
कुटून काॅफिबिया गं
काॅफीपान करावे,किंवा
या चिजा अन्य कुणाला
देऊन टाकाव्यात वापरायला.....!
-----------
सऊदी अरब के अब्दुल्ला इब्न बदिया ने बदूईन ( सहारा रेगिस्तान के घुमंतू पशुपालक कबीले) स्त्रियों की मौखिक अलिखित कविताओं का एक संकलन तैयार किया था जो अब तक का प्रतिनिधि संकलन माना जाता है।उस संकलन से उद्धृत एक बदूईन कविता जो मार्सेल कुपरशोएक के अंग्रेजी अनुवाद पर आधारित है।
इस कविता में आठ सालों की ब्याहता स्त्री अपने मर्द से शिकायती लहजे में कहती है - तुम मुझे बच्चा नहीं दे सकते तो तलाक दे कर ही मुझे मुक्त कर दो।
उस मर्द की बात क्या करनी
जिसने कॉफी पीने के सुंदर सेट
और कूटने वाले खल खरीदे
पर कॉफी के बीज
कभी कूटे पीसे नहीं इसमें
एक बार भी नहीं आठ सालों में
या तो वह मर्दों की तरह
उन सामानों का इस्तेमाल करे
कॉफी बनाए पिए
या फिर दे डाले उन्हें
किसी और को
उसके उपयोग के लिए....
---------
मूळ बदायुनी कवितांचा
मार्शेल कुपरशोएक
यांच्या इंग्रजी अनुवादावरून
हिंदी अनुवाद
यादवेंद्र Yadvendra
स्वैर मराठी अनुवाद