जेव्हा आपण असं म्हणतो की
बाईने पतंगासारखं स्वतंत्र-स्वच्छंद असलं पाहिजे
तेव्हा बहूधा आपण हे विसरून जात असतो की
बाई ही पतंगच आहे
पतंगाप्रमाणेच ती आकाशात कितीही उंच किंवा दूर भलेही उडत जात असली तरी तिच्या पायात पितृसत्ताकतेचा एक बारीक पण बळकट दोर नेहमीच बांधलेला असतो
नभात विहरणार्या पतंगाप्रमाणे बाईलाही ठाऊक असतात आपल्या मर्यादा आणि आपल्या मालकाच्या आज्ञा....
काही बायका,
ज्यांनी आपल्या प्रवाहाने तोडलेत
ते मांजे,
इतिहासात कापल्या,फोडल्या व लूटल्या गेल्याचे
सांगितले गेले
कापल्या,फाडल्या व लूटल्या गेलेल्या पतंगांना आणि बायकांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नात हौतात्म्य पत्करलेले वीर-वीरांगणा म्हटलं जायला हवं.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जब हम यह कहते हैं कि
स्त्री को पतंग की तरह आज़ाद होना चाहिए
तब प्रायः हम यह भूल जाते हैं कि स्त्री पतंग ही है
पतंग की तरह ही वह आकाश में चाहें
जितना भी ऊंचा या दूर क्यों न उड़ लें मगर
उसके पैरों में पितृसत्ता का एक महीन मगर मज़बूत धागा हमेशा ही बंधा रहता है
नभ में विचरते हुए पतंग की तरह स्त्री को भी ज्ञात होती हैं
अपनी सीमाएं और अपने मालिक की आज्ञाएं...
कुछ स्त्रियाँ,
जिन्होंने अपनी रौ में तोड़ दिए वे मांझे,
इतिहास में कटी,पिटी व लुटी हुई बताई गईं
इतिहास में कटी,पिटी व लुटी हुई बताई गईं
कटी,पिटी व लूटी हुईं पतंगों और स्त्रियों को
पूर्ण स्वतंत्रता पाने के प्रयास में शहीद हुई
वीरांगनाएं कहा जाना चाहिए
©Ajay 'Durdney'
अजय 'दुर्ज्ञेय'
अजय 'दुर्ज्ञेय'