मुख्य शत्रू कोण?
जर एखादा मोठा देश लहान देशाची दडपशाही
करत असेल-
तर मी लहान देशाच्या बाजूने उभा राहीन.
तर मी लहान देशाच्या बाजूने उभा राहीन.
जर त्या लहान देशातला बहूसंख्याक धर्म-
तेथील अल्पसंख्याक धर्माला दडपत
असेल तर मी अल्पसंख्याक धर्मासोबत उभे
राहाणे पसंत करेन.
जर त्या अल्पसंख्याक धर्मातील जाती
एखाद्या दूसर्या जातीला दाबत असतील तर मी
त्या जातीबरोबर उभा राहीन.
जर त्या जातीतील कुणी मालक आपल्या
कामगाराचे शोषण करीत असेल तर मी
त्या कामगारासोबत उभा असेन.
जर तो कामगार घरी जाऊन
आपल्या बायकोला मारत असेल तर मी
त्या बाईसोबत उभा राहीन.
माझे मुख्य शत्रू हे शोषण आणि अत्याचार आहेत.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ विचारोक्तीः
थोर समाजसुधारक
पेरियार रामास्वामी