जगातील सर्वात सुंदर स्त्री

जगातील सर्वात सुंदर स्त्री


जगातील सर्वात सुंदर स्त्री

मुग्ध
पण शब्दहीन आहे
या सुंदरतेचं वर्णन कसं करु?
कुठलीच उपमा सूचत नाहीए
सृष्टीचं अवघं सौंदर्य मोहित होऊन जावं
कुणी इतकंही सुंदर असू शकतं का?
ही तर अशी लावण्यवती आहे
चर्येवर तेजाची चमक
या नयनांना काय नाव देऊ?
या दंतपंक्तीला काय संबोधू?
अस्फुट हास्याला कसे वर्णावे??
मातीशी बिलगलेली
ताज्या फुलाप्रमाणे नाजूक
मनुष्यतेने ओथंबलेला चेहरा
या प्रमाणे निरागस की,
कुठल्याशा अन्य लोकातूनच आलीय जणू
दुनियेच्या नीचपणाने तिला स्पर्शही 
केलेला नसावा अद्याप
माहीत नाही,
ही जिवंत माणूस आहे
की कुण्या महान शिल्पकाराने कोरलेले एखादे शिल्प
बहूधा गोर्कीची किशोरवयीन आईसुध्दा 
इतकीच सुंदर होती
बहूधा माझी किशोरवयीन आईही
काहीशी हिच्यासारखीच होती जणू!

मूळ हिंदी कविता
सिध्दार्थ रामू
Sidharth Ramu

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने