श्रेष्ठ उर्दू साहित्यिक
सआदत मंटो यांच्या
स्मृत्यर्थ लघुकथा
कुंटणखानाः तीन लघुकथा
{ एक }
- आपण काय करता बरं?
तिनं साडी उतरवत विचारलं.
- पुढारी आहे!
तो खादी उतरवत
बिचकतच बोलला.
- अरे व्वा!
तुम्ही तर आमच्याच
जमातीचे निघालात...की!!
तुम्हांला तर डिस्काऊंट
द्यायला पायजेल!
{ दोन }
- आपल्याशी लगीन करशील?
त्यानं उठत असताना विचारलं.
- का?
रोजचा खर्च करून करून
फाटायला लागली की काय?
{ तीन }
- तुझं नाव काय?
त्यानं रूममध्ये घूसताच विचारलं.
- तू ज्या जाती-धर्माचा आहेस ना
त्याच्या नेमका उलट विचार कर....
नायतर
मजा नाय येनार तुला!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
मोहन कुमार नागर
Mohan Kumar Nagar