पुढचा मुक्काम

पुढचा मुक्काम


पुढचा मुक्काम


आपला पुढचा मुक्काम

मरूभूमीत असेल

नंतरचा समुद्रात

त्यानंतरचा 

सफरचंदाच्या उपवनात


मग उल्लंघून जावू एक सुंदर बेट

आणि अखेरीस मिळवू

आपलं एक घर

सर्वात सुंदर


एवढेच नाही

तिथे थांबल्या-थांबल्या

पार करू

याहूनही दूर-दूरचे अंतर


एखाद्या धरती-वाळवंट

किंवा सागरांमधले नाही

तर परस्परांच्या हृदयांमधले.


मराठी अनुवाद

भरत यादव

Bharat Yadav


मूळ हिंदी कविता

अगला पड़ाव

 

हमारा अगला पड़ाव

रेगिस्तान में होगा

बाद वाला समुद्र में

इसके बाद वाला सेब के बगीचे में

 

फिर पार करेंगे एक सुंदर टापू

और अंत में पा लेंगे

अपना एक घर

सबसे सुंदर

 

इतना ही नहीं

वहीं रुके-रुके

पार करेंगे

इससे भी लंबी दूरी

 

किसी धरती, मरुस्थल

या सागर की नहीं

बल्कि एक दूसरे के हृदय की


©नरेश अग्रवाल

Naresh Agrawala
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने