गरजत येत आहे !

गरजत येत आहे !

गरजत येत आहे!

रात्रीच्या अंधारात
आली असती तर म्हणता
येऊही शकले असते की 
दिसली नाही
पण भर दुपारी येत आहे
धर्मांधता

सकारण असते तर
म्हणू शकलो असतो की
समजले नाही,पण उघड उघड
अन्याय करताहेत कट्टरतावादी
सत्तेच्या मदतीने

लपून केली असती
तर म्हणालो असतो की माहितीच 
झालं नाही आम्हांला,पण
जाहीररित्या सुरू आहे इथे गुंडगिरी
दुर्बलांवर

बोलून विकते तर
म्हणाले असतो की 
गरजेचेच होते हे,पण 
भ्रष्टाचाराने विकल्या जातायत
उत्पादक राष्ट्राच्या अनेक संस्था

दबक्या पावलांनी आली असती
तर म्हणू शकलो असतो की
ऐकलेच नाही
अरे कर्मकरंट्यांनो,
गरजत येत आहे हुकूमशाही
या महादेशात

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

रात के अँधेरे में 
आती तो कहा भी जा सकता था
कि दिखाई नहीं 
दिया लेकिन धौली दोपहर में आ
रही है धर्मांधता 

बहाने से होता 
तो बता सकते थे कि समझा नहीं 
लेकिन खुले में 
अन्याय कर रहे हैं आतताई लोग
सत्ता के सहारे 

छुप कर करते
तो कह सकते थे कि ज्ञात ही नहीं 
हुआ हमें किंतु
सरेआम हो रही है गुण्डागर्दी यहाँ
दुर्बलों के साथ

बात पर बेचते
तो कहते कि अवश्यम्भावी था ये
किन्तु भ्रष्टाचार 
में बिक रही हैं उत्पादक राष्ट्र की
अनेक संस्थायें

दबे पाँव आती
तो कह सकते थे कि सुना ही नहीं 
अरे बदनसीबों 
दहाड़ते हुये आ रही है तानाशाही 
इस महादेश में 

©कैलाश मनहर
Kailash Manhar

    • 2 टिप्पण्या

      टिप्पणी पोस्ट करा
      थोडे नवीन जरा जुने