आजकालचे अभंग !

आजकालचे अभंग !


आजकालचे अभंग!

कोल्हा सांगे आता
भूमिकेचे मर्म
खुनाचेही कर्म
कलात्मक

विषारी द्राक्षांना
मानतो हा गोड
बेइमानी खोड
कोल्ह्याची गा

कच्च्या मडक्यांचा
भरला बाजार
उन्मादाचा बार
ठासलेला

मानियले आम्ही
राष्ट्रवादी ज्याला
संघ-सभा वाला
निघाला तो

'खळांची व्यंकटी'
सांडणार कशी
खोट्याची सरशी
होई इथे

किती केले गोळा
सत्तेसाठी टगे
बाजार बुणगे
गवसले

कैवार नथ्थुचा
घेई जो जो कुणी
ते ते सर्व खूनी
मानव्याचे

सत्य अहिंसेची
कळे ना महत्ता
त्याची गुणवत्ता
व्यर्थ आहे

©भरत यादव
Bharat Yadav

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने