आणि पून्हा तुझा फोन येतो !

आणि पून्हा तुझा फोन येतो !










आणि पून्हा तुझा फोन येतो !

रिंग वाजताक्षणी
फोनच्या स्क्रीनवर
दिसू लागतो तुझा नंबर
तो नंबर....
जो कधी सेव्ह केलाच नाही...
ना कधी आठवण्याचाही
प्रयत्न केला..

खरं सांगायचं तर
कुणी विचारलं कधी, 
तर सांगू पण शकणार नाही 
मी तुझा नंबर..
आणि ना तुझा चेहरा

परंतू एका क्षणातच
ओळखते
की हा तुच आहेस ते
थरथरत्या हातांनी फोन उचलून
जेव्हा ऐकते
तुझा हॅॅलो..
मोहोर उमटते माझ्या विचारांवर

तू विचारतोस,
'कशी आहेस...
बोलून टाक,जे बोलायचंय ते'

मी माझ्या हृदयाची धडधड 
सांभाळत म्हणते...
'सगळं ठिकंय इथं...
आणि सांंगण्या-ऐकण्यासाठी
काहीही उरलं नाहीये आता..'

पण माहित्येय तुला...
न जाणो कितीक गोष्टी सांभाळून ठेवल्यायत मी
ज्या तुला आणि
फक्त तुलाच सांगायच्यायत..

काल संध्याकाळी एक इवलीशी चिमणी 
आली होती माळवदावर
तासभर तुझं नाव घेत चिवचिव करत राहिली

घरामागच्या झाडावर
आता कोकीळ कुहकुहत आहे
वाटतंय की मोहोर लगडायला आलाय

माहितीय का
माझ्या मित्रांनी पुन्हा
मी शाकाहारी असण्याबद्दल
माझी टर उडवली
मी लटकेच काहीवेळ फुरंगटून राहिले

काल उगाच कुणाशी तरी
पंगा घेतला होता
आता असं म्हणू नकोस की तू वेडी 
आहेस म्हणून

ते जे 
जाॅन एलिया साहेबांचं पुस्तक 
आहे ना,
अडून राहाते मी
कैक कैक दिवसांपर्यंत एकाच गझलेवर

या ज्या बातम्या पसरल्यायत ना पेपरात 
आणि न्यूज चॅनेल्सवर,
जरा आपण सोबत असतो तर
आपल्यावरसुद्धा बातम्या बनवल्या असत्या 
त्यांनी मिळून त्यांच्या ढंगात

माझी सर्वात चांगली मैत्रिण खूप नाराज 
आहे माझ्यावर कारण
माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे म्हणून

श्वास घेणे ही एक रीत आहे..
आणि उघड्या डोळ्याने स्वप्नं पाहाणं गुन्हा

मी गप्प असते..
तुझा फोन ठेऊन तासन्  तास रडते
लोक अनेक दिवसांपर्यंत मला माझ्या 
सुजलेल्या डोळ्यांचे कारण विचारतात
मी बहाणे बनवते..
अथक प्रयासाने 
मी ओठांवर बेगडी हास्याचा पेहराव
चढवते

अनेक महिन्यांची
मौन प्रतिक्षा
आणि
त्यानंतर एके दिवशी
पून्हा तुझा फोन येतो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

घंटी बजने के साथ ही 
फ़ोन की स्क्रीन पर 
उभरता है तुम्हारा नंबर
वह नंबर... जो कभी सेव किया ही नहीं.. 
ना ही कभी याद करने की 
कोशिश ही की.. 

सच कहूँ तो 
कोई पूछे कभी 
तो बता भी न पाऊँगी
न तो तुम्हारा नंबर.. 
और ना ही तुम्हारा चेहरा

लेकिन एक क्षण में ही 
पहचान जाती हूँ 
के यह तुम हो
कँपकपातें हाथों से फोन उठा 
जब सुनती हूँ 
तुम्हारी "हैलो" 
मुहर लगती है मेरे ख़यालों पर

तुम पूछते हो 
"कैसी हो... 
कह भी दो, जो भी कहना है"

मैं अपने दिल की धड़कनें सँभालते हुए कहती हूँ...
" सब ठीक है यहाँ... 
और कहने-सुनने के लिए 
कुछ भी बाक़ी नहीं अब" 

मगर जानते हो.. 
जाने कितनी बातें सहेज रखीं हैं मैंने 
जो तुम्हें और
सिर्फ़ तुम्हें ही बतानी हैं

कल शाम एक नन्हीं गौरैया आई थी अटारी पर,
घंटे भर तुम्हारा नाम लेकर चहचहाती रही

घर के पीछे वाले पेड़ पर
अब कोयल कूकने लगी है.. 
लगता है बौर लगने को हैं

जानते हो मेरे दोस्तों ने फिर से 
मेरे वेजिटेरियन होने का मजाक उड़ाया
मैं झूठ-मूठ कुछ देर तक रूठी रही

कल बेवज्ह फिर मैं किसी से उलझ पड़ी थी 
अब ये न कहना कि तुम तो पागल हो

वो जो जाॅन एलिया साहब की किताब है न, 
अटकी रहती हूँ मैं 
कई-कई दिनों तक एक ही ग़ज़ल पर

ये जो ख़बरें छाईं हैं न अख़बारों और न्यूज़ चैनल्स में, 
ज़रा हम साथ बैंठे
तो अपनी ख़बरें बनाते मिलकर उनके अंदाज़ में

मेरी सबसे अच्छी सहेली बहुत नाराज़ है मुझसे 
इस बात पर, 
कि मुझे अब तक तुमसे मुहब्बत है

साँस लेना एक रस्म है.. 
और ख़ुली आँखों से सपने देखना ज़ुर्म

मैं चुप रहती हूँ.. 
तुम्हारा फ़ोन रखकर घंटों रोती हूँ
लोग कई दिनों तक मुझसे 
मेरी सूजी हुई आँखों का सबब पूछते हैं
मैं बहाने बनाती हूँ.. 
बड़ी मशक़्क़त से 
मैं होंठों को नकली मुस्कान का जामा पहनाती हूँ

महीनों की 
मौन प्रतीक्षा 
और 
उसके बाद एक दिन 
फिर से तुम्हारा फ़ोन आता है

©पूनम सोनछात्रा 
Poonam Sonchatra
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने