काॅल वर

काॅल वर


काॅल वर

आई जेव्हाही फोन करायची
तू म्हणायचास
आई मी आता काॅल वर आहे
नंतर लावतो

तुझा फोन
नंतरही जेव्हा नाही यायचा
आई तुला व्हाटसअपवर व्हिडिओ काॅल करायची
व्यग्र दिसणारा तू
पुन्हा तेच बोलायचास
बघ ना आई मी काॅल वर आहे

दररोज असेच व्हायचे
आई काही नाही म्हणायची
ती समजून घ्यायची तुझी व्यग्रता

असाच एकेदिवशी
आईचा 'काॅल' येतो
निघून जाते आई
वडिल तुला फोन काॅल करून सांगतात,
आईबद्दल

पृथ्वीच्या दूसर्‍या टोकापासून
धावत येतोस तू
प्रचंड अस्वस्थ आणि उद्विग्न 
आपल्या गेलेल्या आईला भेटायला

आईवर खूप प्रेम होते तुझे
आणि आईचेही तुझ्यावर
बस्स
दोघं एकमेकांच्या काॅललाच
नीट अॅडजस्ट नाही करू शकलात !

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

काॅल पर

मां जब भी फोन करती 
तुम कहते 
मां मैं अभी कॉल पर हूँ
बाद में लगाता हूँ

तुम्हारा फोन 
फिर भी जब नहीं आता
मां तुम्हें व्हाट्सएप पर वीडियो कॉल लगातीं
व्यस्त से दिखते तुम
फिर वही कहते 
देखो ना मां मैं कॉल पर हूँ

रोज ही ऐसा होता
मां कुछ नहीं कहती 
वह समझती थी तुम्हारी व्यस्तता

ऐसे ही एक दिन 
मां का  'कॉल' आ जाता है 
चली जाती है मां
पिता तुम्हें फ़ोन कॉल कर बताते हैं
मां के बारे में

पृथ्वी के दूसरे छोर से 
दौड़े हुए आते हो तुम
बेहद बेचैन और उद्विग्न
अपनी चली गई मां से मिलने

मां से बहुत प्यार करते थे तुम
और मां भी तुम्हें
बस 
दोनों एक दूसरे के कॉल को ही
ठीक से ऐडजस्ट नहीं कर पाये !

©राजहंस सेठ
Rajhans Seth
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने