हे राम !

हे राम !


हे राम !

जय श्रीरामवाल्यांकडे
जीव सोपवून
'हे राम' उद्गारून
निघून गेले बापू

'हे राम'च्या आधी ते
काही नाही बोलले
'हे राम'च्या नंतर
काही बोलू नाही शकले
एका शब्दात त्यांनी
खूप काही सांगितलं
एका शब्दात ते
वर्षानुवर्षे बोलले

आम्हीही वर्षानुवर्षे म्हणालो
जय श्रीराम
वर्षानुवर्षे आम्ही घोषणा दिल्या
'हे राम'मधून निघणार्‍या वेदनेला दडपण्यासाठी
जय श्रीराम सामुहिक 
उत्सव होता
उन्माद होता
'हे राम' व्यक्तीगत अंतर्नाद होता
अहिंसेचे घोषणापत्र होते

पराभूत होऊन पुनःपुन्हा कोसळणार्‍या माणसाच्या
प्रयत्नांचे सामर्थ्य होते 'हे राम'
कण्हणार्‍या,
अडखळत धडपडणार्‍या
माणसाचा निःश्वास होता 'हे राम'
आम्ही उन्मादात निःश्वास नाही ऐकला
आम्ही उत्सवात वेदना नाही पाहिली

प्रयत्नांच्या शक्तीवर
घृणेचे वज्रापात होत राहिले
अहिंसेचा वध करण्यासाठी हिंसा
पुनःपून्हा येत राहिली
जय श्रीरामच्या हिंसक गदारोळात अखेर हरवून गेला अहिंसक 'हे राम'

ऐका जय श्रीरामवाल्यांनो
जय श्रीरामच्या घोषणांखाली दबलेले
वेदनोद्गार 'हे राम' म्हणत
प्राणमुक्त होऊ पाहतायत
राष्ट्राला हिंसेच्या हवाली करून
आता अहिंसा निरोप घेऊ पाहातेय
की घ्या
सांभाळा हे राष्ट्र

पण तुम्ही ऐका
राष्ट्राला रामभरोसे सोडून
सामुहिक आर्तनादात पलटण्याच्या खेळात जय श्रीरामचा उन्माद
'हे राम'च्या आर्तनादात बदलून गेलाय

कोसळणारे राष्ट्र
मरत चाललेली माणुसकी
दफन होत असलेली मानवता
जय श्रीराम नव्हे तर
'हे राम' उच्चारते आहे

जय श्रीरामच्या कोलाहलाबाहेर
'हे राम'चा आर्तनाद ऐका
आमच्या रामाला आता
आणखी अपमानीत करू नका!

मूळ हिंदी कविता

हे राम

जय श्री राम वालों  को
जान सौंप कर
हे राम बोलकर
चले गए बापू

हे राम से पहले वे
कुछ नही बोले
हे राम के बाद वे
कुछ बोल नही सके
एक शब्द में उन्होंने
बहुत कुछ कहा
एक शब्द में वे
बरसों बोले

हम भी बरसो बोले जय श्री राम
बरसों हमने उद्घोष किये
हे राम से उभरती पीड़ा को दबाने के लिए
जय श्री राम सामूहिक उत्सव था/ उन्माद था
हे राम व्यक्तिक आर्तनाद था
अहिंसा का घोषणा पत्र था 

हार कर बार-बार गिर रहे मनुष्य की
कोशिश का बल था हे राम
कराहते लड़खड़ाते गिरते पड़ते 
मनुष्य की आह थी हे राम
हमने उन्माद में आह नही सुनी
हमने उत्सव में पीड़ा नही देखी
कोशिशों के बल पर
घृणा के वज्रपात होते रहे

अहिंसा का वध करने हिंसा बार-बार आती रही 
जय श्री राम के हिंसक शोर में अंततः
खो गया अहिंसक हे राम
सुनो जय श्री राम वालों
जय श्री राम के नारे के नीचे दबी कराहटें 
हे राम कहकर
प्राण मुक्त होना चाहती हैं 
हिंसा के हवाले छोड़ मुल्क
अब अहिंसा विदा लेना चाहती है
कि लो
सम्भाल लो मुल्क

सुनो मगर तुम
कि मुल्क को राम भरोसे छोड़कर
सामूहिक आर्तनाद में बदलने के खेल में
जय श्री राम का उन्माद
है राम के आर्तनाद में बदल गया है
गिरता मुल्क
मरती मनुष्यता
दफन होती इंसानियत
जय श्री राम नही
हे राम उच्चार रही है

जय श्री राम के शोर से बाहर
हे राम का आर्तनाद सुनो 
हमारे श्री राम को अब
और जलील न करो

©वीरेंदर भाटिया
virendar bhatia

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने