शहरी जंगल
ते हाकून लावतात
जणू काही असावे
एखादे जनावर
ते झिडकारून लावतात
जणू काही असावा
एखादा भिकारी
ते आदेश ऐकवतात
जणू काही आदिवासी
असावेत त्यांचे गुलाम
शहरी जंगल
विकासाच्या नावावर धमकावत सुटलेय
जंगलवासियांना...!
मराठी अनुवाद
भरत यादव
मूळ हिंदी कविता
वो हांक देते हैं
जैसे हो
जानवर कोई,
वे दुत्कार देते हैं
जैसे कोई भिखारी,
वे फरमान सुना देते हैं
जैसे हों उनके गुलाम,
शहर का जंगल
विकास करता धमकाता है
जंगलवासी को...!
©देवेन्द्रकुमार
Devender Kumar
चित्रःआंदोलनरत आदिवासी,बस्तर