हुकूमशहा आदर्श नसतात

हुकूमशहा आदर्श नसतात


हुकूमशहा आदर्श नसतात


हुकूमशहा आदर्श नसतात कुणाचे,
ते घृणेचे प्रतिनिधी असतात,
हिंसेचे वाहक,
सत्तेचे लोभी असतात,
ते आपल्या असण्यासमोर
कुणाचे असणे सहन करीत नाहीत
दंभास्त्राने सज्ज हुकूमशहा
कधी राष्ट्रवादाचा दंभ फेकतात
कधी धर्माचा,खरेतर
हुकूमशहाला ना राष्ट्रवादाशी देणेघेणे असते ना धर्माशी
त्यांना खुजे लोक पसंत असतात
हुकूमशहा राष्ट्राच्या प्रत्येक वैशिष्ठ्याला खुजे करण्याच्या कारस्थानात असतात प्रत्येकवेळी
हुकूमशहा मोठा दिसावा यासाठी


ज्यांचे आदर्श आहेत हुकूमशहा
त्यांच्यापासून योग्य तितके अंतर ठेवण्याचा 
सल्ला दिला जातो
हुकूमशहा ज्यांच्या घरांमध्ये आदर्शाप्रमाणे 
स्थापन आहे
ते आपल्या घरांमध्ये प्रत्येकक्षणी
दाबून ठेवत असतात स्फोटके
त्यांच्या आत संताप आणि 
तिरस्कार ठासलेला असतो
ते मुलांसाठी हिंसक बनतात
आणि पत्नीसाठी शोषक
ते स्त्रियांच्या विरूद्ध असतात
आणि अधर्माला धर्म म्हणत
आपल्या धर्माची टर उडवित असतात
त्यांच्या भाषेमधून गोडवा निघून गेलेला असतो
शिव्यांना ते तर्कनिष्ठतेपुढे 
शस्त्रांसारखे वापरतात
आणि स्वतः घायाळ होऊन जातात
हुकूमशहा ज्यांचे आदर्श असतात
त्यांच्यापासून योग्य ते अंतर राखण्याचा सल्ला दिला जातो
असे लोक चालते फिरते स्फोटकं असतात
जे नेहमी आपल्यांवर फुटून पडतात.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

तानाशाह आदर्श नही होते

1
तानाशाह आदर्श नही होते किसी के
वे नफरत के प्रतिनिधि होते हैं
हिंसा के संवाहक
सता के लोभी होते हैं
वे अपने होने के आगे
किसी का होना बर्दाश्त नही करते
नशे के अस्त्र से लैस तानाशाह
कभी राष्ट्रवाद का नशा फेंकते हैं
कभी धर्म का
तानाशाह को
न राष्ट्रवाद से मतलब होता है न धर्म से
उन्हें बौने लोग पसन्द होते हैं
तानाशाह राष्ट्र की हर खूबी को बौना 
कर देने की साजिश में रहते हैं हर वक़्त
ताकि तानाशाह बड़ा दिखाई दे

2

जिनके आदर्श हैं तानाशाह
उनसे उचित दूरी बनाए रखने की सलाह दी जाती है
तानाशाह जिनके घरों मे आदर्श की तरह स्थापित हैं
वे अपने घर मे हर वक्त दबाए रखते हैं विस्फोटक
उनके भीतर गुस्सा और नफरत भरी रहती है
वे बच्चों के प्रति हिंसक होते हैं
और पत्नी के उत्पीड़क
वे स्त्री के खिलाफ होते हैं
और अधर्म को धर्म कह कर
अपने धर्म की खिल्ली उड़वा रहे होते हैं
उनकी भाषा मे मिठास चुक जाती है
गालियों को वे तर्क के सामने हथियार की तरह बरतते हैं
और खुद चोटिल हो जाते हैं
तानाशाह जिनके आदर्श होते हैं
उनसे उचित दूरी बनाए रखने की सलाह दी जाती है
ऐसे लोग चलते फिरते विस्फोटक होते हैं
जो अक्सर
अपनो पर फटते हैं।

©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने