यांची
एक कथा
'बापाचे नाव'
एक कथा
'बापाचे नाव'
त्याला नेहमी वाटायचं की त्याला आपल्या बापाचे नाव बदलायला हवे.
कारण त्याच्या बापाचे नाव त्याच्या नावापेक्षा 'मोठे' होते.
त्याला कधीही कुणी भेटे ते त्याच्या बापाशी त्याची तुलना करीत असत आणि तो मात्र मनातल्या मनात जळून राख होऊन जात असे.
त्याच्या बापाने अशी काही मोठमोठी कामे केलेली होती की लोक त्यांना कधीच विसरू शकत नव्हते.
तो आयुष्यभर धडपड करत राहिला
की बापाचे नाव त्याच्या नावापेक्षा लहान व्हावे म्हणून,
पण ते नाही होऊ शकले.
मग तो बापाचे नाव बदलण्याचा जीव ओतून प्रयत्न करायला लागला.त्यासाठी त्याने हे गरजेचे मानले की बापाची प्रत्येक खूण मिटवली गेली पाहिजे.
सर्वात आधी त्याने बापाचे उरलेसुरले कपडे अशा पद्धतीने जाळले की जसे राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात परदेशी कपड्यांची होळी केली जात असे.
बापाने जे फर्निचर खरेदी केले होते ते तर त्याने अगोदरच मोडून तोडून विकून टाकले होते.
बापाची खूप मौल्यवान ग्रंथसंपदा,कागदपत्रंसुद्धा त्याने जाळून टाकली होती.
संपूर्ण घरातून शोधून शोधून त्याने बापाची छायाचित्रे एकत्र करून जाळली होती.जिथे जिथे बापाचे कुठलेही चित्र सापडण्याची शक्यता होती तेथून ती घेऊन फाडून टाकली होती.
बापाशी आपला संबंध तोडण्यासाठी जुने पिढीजात घर म्हणजे एक मोठा अडथळा वाटला त्याला.
त्याने ते घर पाडण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा हे त्याच्या मातोश्रीला कळले तेव्हा त्या म्हणाल्या
-बेटा आपण राहणार कुठे?
तो म्हणाला,
कुठेही राहू या पण मी या घराची एक एक वीट तोडून टाकेन.
कुणाला शोधूनसुद्धा या घराचा एक तुकडादेखील मिळणार नाही.
मी एक भव्य निवास बनवेन जे बापाच्या घरापेक्षा एकदम वेगळे दिसेल.
त्याने संपूर्ण घर पाडून घेतले.
नवे भव्य निवास उभे केले.
पण तरिही लोकांनी हे मान्य नाही केले की त्याचा बाप दूसरा कुणीतरी होता.
आता एकच मार्ग शिल्लक राहिला होता.
तो आपल्या आईजवळ गेला.
त्याने आपल्या मातोश्रीचे चरणवंदन केले व म्हणाला-
आई मी तुला असं काही मागू पाहतोय की जे आजवर कुठल्याच मुलाने आपल्या आईजवळ मागितले नसेल.
मला वचन दे की तू मला देशील.
आई म्हणाली बेटा-
तुझ्यासाठी जीव देऊ शकते...
यापेक्षा अधिक तू काय मागू शकतोस?
तो म्हणाला-
आई जीवापेक्षाही मोठी गोष्ट मागायला आलो आहे.
आई म्हणाली-
मी नाही समजले बेटा...तू काय मागू पाहातोयस ते? माग बरं.
तो म्हणाला-
नीट विचार कर आई....नकार नको देऊस...तसा तर नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही...तूला हो,तर कुठल्याही स्थितीत म्हणावेच लागेल.
आई म्हणाली-
माग बेटा,काय मागतोस.
तो म्हणाला,
आई तुला जनतेसमोर....माध्यमांसमोर...हे सांगावे लागेल की मी आपल्या बापाचे अपत्य नाहीये.
हे ऐकून त्याची आई थरथर कापू लागली.
आई बोलली-
बेटा म्हातारपणी एवढे मोठे खोटे...एवढा मोठा अपमान....एवढे मोठे दुःख....तू मला का देऊ पाहातोयस?
तो म्हणाला-
हे माझ्या सुखासाठी आवश्यक आहे...मातांनी नेहमीच मुलांसाठी बलिदान दिलेले आहे....आज तुला हे बलिदान द्यावेच लागेल.
त्याची आई
जनतेपुढे,माध्यमांपुढे तेच बोलली जे तो तिच्याकडून वदवून घेऊ पाहात होता आणि त्यानंतर ती वृद्धा स्टेजवरच कोसळली.
कधी नाही उठली.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कथा
पिता का नाम
उसे बराबर लगता था कि उसे अपने पिता का नाम बदलना चाहिए।
कारण यह था कि उसके पिता का नाम उसके नाम से 'बड़ा' था।
उससे जब भी कोई मिलता था उसके पिता से उसकी तुलना करता था और वह दिल ही दिल में जलकर राख हो जाया करता था।
उसके पिता ने ऐसे बड़े काम किए थे जिन्हें लोग कभी भूल नहीं पाते थे।
वह जीवन भर कोशिश करता रहा कि पिता का नाम उसके नाम से छोटा हो जाए लेकिन नहीं हो पाया।
तब वह इस कोशिश में जी जान से जुट गया कि पिता का नाम बदल दे । इसके लिए उसने जरूरी समझा की पिता की हर निशानी को मिटा दिया जाए।
सबसे पहले उसने पिता के बचे खुचे कपड़े इस तरह जला दिए जैसे राष्ट्रीय आंदोलन के दौर में विदेशी कपड़े जलाए जाते थे।
पिता ने जो फर्नीचर ख़रीदा था उसको तो वह पहले ही तोड़ ताड़कर बेच चुका था।
पिता की बहुत कीमती किताबें, कागज़ भी वह जला चुका था।
पूरे घर में ढूंढ ढूंढ कर उसने पिता की तस्वीरें जमा करके जला डाली थीं।
जहां जहां पिता की कोई तस्वीर मिलने की संभावना थी वहां से तस्वीरें लेकर फाड़ डाली थीं ।
पिता से अपना संबंध तोड़ने के लिए उसे पुश्तैनी मकान एक बड़ी बाधा नजर आया। उसने मकान को तुड़वाने का फैसला कर लिया।
जब यह उसकी माता जी को पता चला तो उन्होंने कहा - बेटा हम रहेंगे कहां?
उसने कहा ,- कहीं भी रह लेंगे लेकिन मैं इस मकान की एक एक ईंट तुड़वा दूंगा। किसी को ढूंढने से भी इस मकान का एक टुकड़ा नहीं मिलेगा। मैं एक आलीशान मकान बनवाऊँगा जो पिता के मकान से बिल्कुल अलग दिखेगा।
उसने पूरा मकान तुड़वा दिया। नया आलीशान मकान बनवा दिया। लेकिन फिर भी लोगों ने यह नहीं माना कि उसका पिता कोई और था।
अब एक ही रास्ता बचता था। वह अपनी मां के पास गया। उसने अपनी माता जी के चरण छू कर कहा- माता मैं तुमसे कुछ ऐसा मांगना चाहता हूं जो आज तक किसी पुत्र ने अपनी माता से न मांगा होगा। मुझे वचन दो कि तुम मुझे दोगी।
माता ने कहा बेटा - तुम्हारे लिए जान दे सकती हूँ... इससे ज़्यादा तुम क्या मांग सकते हो?
उसने कहा माता - जान से बड़ी चीज मांगने आया हूं।
माता ने कहा - मैं समझी नहीं बेटा.... तुम क्या मांगना चाहते हो? मांगो।
उसने कहा - अच्छी तरह सोच लो माता.... इंकार न करना.....वैसे इनकार करने का कोई सवाल ही नहीं है .... हाँ, तो हर हाल में करनी ही पड़ेगी।
माता ने कहा- मांगो बेटा क्या मांगते हो।
उसने कहा - माता तुम्हें पब्लिक के सामने... मीडिया के सामने ....यह कहना पड़ेगा कि मैं अपने पिता की संतान नहीं हूं ....
यह सुनकर उसकी माता थरथर कांपने लगी ।
माता ने कहा - बेटा बुढ़ापे में इतना बड़ा झूठ ....इतना बड़ा अपमान.... इतना बड़ा दुख ....तुम मुझे क्यों देना चाहते हो ?
उसने कहा - यह मेरे सुख के लिए आवश्यक है... माताओं ने सदा से पुत्रों के लिए बलिदान दिया है ....आज तुमको यह बलिदान देना ही पड़ेगा....
उसकी माता ने पब्लिक के सामने, मीडिया के सामने वही कहा जो वह उससे कहलाना चाहता था और फिर बूढ़ी औरत मंच पर ही गिर गई ।
कभी नहीं उठी।
©असगर वजाहत
Asgar Wajahat
©असगर वजाहत
Asgar Wajahat