लेकींनो...!

लेकींनो...!

लेकींनो..!

माझ्या लेकींनो,
तुम्ही मोठ्या होऊन 
ते सर्वकाही करा
जे तुम्ही करू इच्छित आहात.

आणि 
जर वेळ काढू शकलात
तर
तुम्ही प्रेम करा-
ज्याच्यावर तुम्हांला करू वाटेल.

चंद्रापासून ते 
प्रियकराच्या घरापर्यंत
तुम्ही नीडरपणे जा
भितीशी डोळे भिडवण्यास शिका
आणि शिका तुम्ही हात हातात घेणेसुद्धा.

माझ्या लेकींनो,
माझ्या प्रेयसीकडून शिकलो 
होतो मी कधीकाळी
की
फक्त एवढेच पुरेसे ठरेल
पितृसत्ताकतेची मूळं
उखडण्यासाठी.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

मेरी बच्चियों 
तुम बड़ी होकर सब करना 
जो तुम करना चाहती हो। 

और अगर वक़्त निकल पाए 
तो 
तुम प्रेम करना-
जिससे भी तुम करना चाहो।

चाँद से लेकर 
प्रेयस के घर तक 
तुम बेखौफ जाना 
डर से आँख मिलाना सीखना 
और सीखना तुम हाथ थामना भी।

मेरी बच्चियों 
मेरी प्रेमिका से सीखा था मैंने कभी
कि
बस इतना ही काफी होगा
पितृसत्ता की जड़ें
खोदने के लिए।। 

©किताबगंज
Kitabganj

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने