🇮🇳
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साक्षी ठेऊन आज देशभरातील निवडक विद्रोही कवितांच्या अनुवादाचा उपक्रम सुरु करत आहे.या सर्व कविता मूळ हिंदीतील आणि इतर प्रादेशिक भाषांमधून हिंदीत अनुवादीत केलेल्या आहेत.त्या कवितांचा मराठी अनुवाद त्यांच्या मूळ हिंदी कवितेसोबत मी आपल्यापुढे सादर करणार आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साक्षी ठेऊन आज देशभरातील निवडक विद्रोही कवितांच्या अनुवादाचा उपक्रम सुरु करत आहे.या सर्व कविता मूळ हिंदीतील आणि इतर प्रादेशिक भाषांमधून हिंदीत अनुवादीत केलेल्या आहेत.त्या कवितांचा मराठी अनुवाद त्यांच्या मूळ हिंदी कवितेसोबत मी आपल्यापुढे सादर करणार आहे.
या सर्व कविता म्हणजे हिंदी पट्ट्यात सक्रिय असलेल्या जुटान सांस्कृतिक-साहित्यिक संस्थेकडून
२०२० साली लाॅकडाऊन च्या काळात झालेल्या फेसबुकवरी थेट सादरीकरणाचे संकलनाचे पुस्तक आहे.ज्याचे साक्षेपी संपादन कवी-समीक्षक आणि जुटान चे राष्ट्रीय संयोजक, सामाजिक कार्यकर्ते रंजीत वर्मा यांनी केलेय.जुटान श्रृंखला १ या शीर्षकाखाली हे महत्वाचे संकलन अगोरा प्रकाशन ने वाचकांपुढे आणले आहे.
हे पुस्तक शेतकरी आंदोलन,
नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलन आणि अर्बन नक्सलीच्या नावाखाली तुरूंगात डांबण्यात आलेल्या तमाम कार्यकर्त्यांना अर्पण करण्यात आलेले आहे.या संकलनातील एक एक कविता म्हणजे 'जन-गण-मन' म्हणजेच खर्याखुर्या भारतीयाचा विद्रोही उद्गार आहे.भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये विखुरलेला हा प्रतिरोधाचा म्हणजेच विद्रोहाचा सूर या संकलनात शब्दाशब्दात अंगार घेऊन समोर उभा ठाकला आहे.
या कविता सादर करणार्या प्रत्येक कवी आणि कवयित्रीची एक स्वतंत्र वेगळी संघर्षगाथा आहेच.पण इथे वैयक्तिक वेदनेपेक्षाही सामाजिक लढ्याचा सूर या कवितांमधून वाचायला-अनुभवायला मिळतो.
या पुस्तकाचे अगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत हिंदी कवीश्रेष्ठ मंगलेश डबराल यांनी जुटान साठी दिलेले व्याख्यान. जे त्यांचे शेवटचे जाहीर व्याख्यान ठरले.यात ते शब्दबद्ध करण्यात आलेय.त्यामुळे हे कवितांचे संकलन एक ऐतिहासिक दस्तऐवजच ठरला आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मागच्यावर्षी ( २०२१ ) या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालीय.
या देशव्यापी अभियानात हिंदीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ तसेच भारतीय साहित्यविश्वातील दिग्गज जोडले गेले आहेत. फॅसिस्टशाहीविरोधात पुकारण्यात आलेला हा संविधाननिष्ठ भारतीयांचा एल्गार आहे.हे पुस्तक आणि त्यातील कविता हा त्याच व्यापक लढ्याचा एक भाग होत.
जुटानमोहिमेत सहभागी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक धन्यवाद.
मराठी अनुवादाच्या माध्यमातून हा विद्रोही स्वर विनम्रपणे आपल्या पुढ्यात ठेवतोय.
जुटान कविता
१
खरेतर आम्ही आहोत
त्याचे राजा
असेल हिंमत तर आवाज उठवा
असेल हिंमत तर त्याच्या कानापर्यंत
पोहोचवा
पूर्वीही राजाच्याविरोधात कुणी बोलू नाही शकले
आजसुद्धा राजाच्याविरोधात कुणी बोलू शकत नाहीये
परंतू देश बदलत आहे
जो बोलेल,गप्प केलं जावं त्याला
ही काय राजेशाही आहे होय?
नाही नाही ही लोकशाही आहे
इथे आम्ही मानतो ज्याला राजा
खरेतर आम्ही आहोत त्याचे राजा
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ आसामी कवितेचा
हिंदी अनुवाद
असल में हम हैं उसके राजा
है हिम्मत तो आवाज़ उठाओ
है हिम्मत तो उसके कानों तक पहुंचाओ
पहले भी राजा के खिलाफ़
कोई बोल न सका
आज भी राजा के खिलाफ़
कोई बोल नहीं पा रहा
लेकिन देश बदल रहा है
बोले जो, चुप करा दिया जाए उसको
क्या यह कोई राजतंत्र है
नहीं-नहीं यह गणतंत्र है
यहाॅं हम मानें जिसको राजा
असल में हम हैं उसके राजा
©अमृता गोस्वामी
Amrita Goswami