ऊन

ऊन

 ऊन

एकदा मी विचारलं होतं आईला-
'कुठं निघून जातं गं ऊन? 
हळूहळू संध्याकाळपर्यंत'

आई सांगायची,
'जंगलातील झाडांमागं लपत असतं ऊन,
तू झोपी जावा म्हणून
आणि पुन्हा परत येतं सकाळी
तू जागा होण्यापूर्वी'

वर्ष होऊन गेलं
आई येत नाही आता मला उठवण्यासाठी...

वडिल सांगतात-
'ती लपली आहे जंगलात कुठल्याशा झाडामागं'

मी विचारलं-
म्हणजे आईसद्धा ऊन्हासारखी 
होती तर?

वडिलांनी खिडकीकडे बघितलं
आणि माझ्या गालावर हात ठेवत ते 
संथपणे बोलले-
'होय,
ती ऊनच होती रे आपल्या दोघांच्याही जीवनात'

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

धूप

एक बार मैंने पूछा था माँ से-⁣⁣⁣
"कहाँ चली जाती है धूप धीरे-धीरे शाम तक"⁣⁣⁣
⁣⁣⁣
माँ कहती थी-⁣⁣⁣
"जंगल के पेड़ों के पीछे छिप जाती है,⁣⁣⁣
ताकि तुम सो सको⁣⁣⁣
और फिर लौट आती है सुबह⁣⁣⁣
तुम्हारे जागने से पहले"⁣⁣⁣
⁣⁣⁣
साल भर हुआ⁣⁣⁣
माँ नहीं आती अब मुझे जगाने ⁣⁣⁣
पिताजी कहते हैं-⁣⁣⁣
वो छिप गई है जंगल में किसी पेड़ के पीछे⁣⁣⁣
⁣⁣⁣
मैंने पूछा- ⁣⁣⁣
" अच्छा तो क्या माँ भी धूप जैसी थी?"⁣⁣⁣
⁣⁣⁣
पिताजी ने खिड़की की ओर देखा⁣⁣⁣
और मेरे गाल पर हाथ रख ⁣⁣⁣
धीमे से बोले-⁣⁣⁣
" हाँ,वो धूप ही थी हम दोनों के जीवन में ।"⁣⁣⁣

©हेमंत परिहार
Hemant Parihar



1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने