बेरोजगार पोरं

बेरोजगार पोरं

बेरोजगार पोरं!

बेरोजगार पोरं!
दररोज उदास होतात-
आपल्या बेरोजगार प्रेयसीला भेटून
जिच्या स्वप्नांवर भारी आहे
लग्न करण्याचा दबाव.

बेरोजगार पोरं!
पुस्तक वाचता वाचता
वर्तमानपत्रं धुंडाळत
फाॅर्म भरत
आणि परिक्षेच्या तारखांना
गोल करत असतात.

बेरोजगार पोरं!
मम्मीसाठी चहा बनवत
बहिणीच्या सोबत जात
भावाचे सामान वाहत
बापाची बोलणी ऐकत-ऐकत
खेळत राहतात...
पुतणे-पुतणींबरोबर.

बेरोजगार पोरं!
परिक्षा निकालाच्या प्रतिक्षेत
घोषणा देत देत
काठ्या खात खात
आणि पाठीच्या जखमांना गोंजारत
पुन्हा तयारीला लागतात
पुढच्या परिक्षेसाठी.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

बेरोजगार लड़के

बेरोजगार लड़के!
रोज़ मायूस होते हैं-
अपनी बेरोजगार प्रेमिका से मिलकर
जिसके सपनों पर भारी है
शादी करने का दबाव.

बेरोजगार लड़के!
किताब पढ़ते,
अखबार चाटते,
फार्म भरते,
और एग्जाम की तारीखों पर
गोले लगाते हैं.

बेरोजगार लड़के!
मम्मी की चाय बनाते,
बहन से साथ जाते,
भाई का समान ढोते,
पिता की डांट सुनते हुए,
खेलते रहते हैं...
भतीजे-भतीजियों के साथ.

बेरोजगार लड़के!
परीक्षा परिणामों के इंतज़ार में
नारे लगाते,
लाठियां खाते,
और पीठ की चोटों को सहलाते हुए,
फिर से जुट जाते हैं-
अगले एग्जाम के लिए.

©अशोक कुमार
Ashok Kumar

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने