१
मी
जेव्हा केव्हा हाक देतो तिला
कवितेत
ती परतते
तिला भेटून
कैक दिवस झालेत
कितीक वर्षे उलटलीत
अनेक शतकं निघून गेलीयत.
२
मी
चंद्रास मूठीत बंद करू शकतो
खूप सोप्पंय हे
अडचण फक्त इतकीच आहे
मूठ उघडल्यावर
तो दिसू शकत नाही.
३
मी
माझं लिहिलेलं विसरून जातो
पण तुला आठवणीत ठेवतो
कधी पावसात हाक दे मला
मी ओलसर जमिनीप्रमाणे
तुझ्यासमोर हिरवा मिळेन.
४
मी
हाक देतो तुला
हाक देतो तुला मी
तू पालटून पाहिले नाहीस
तुला गुपचूप
आपल्या मनात हाक मारतो मी
तू मनातही पालटून पाहिले नाही.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मैं: चार कविताएं
1.
मैं
जब भी पुकारता हूँ उसे
कविता में
वह लौट आती है
उससे मिले
कई दिन हुए
कई वर्ष बीते
कई सदियाँ बीत गयी हैं।
2.
मैं
चाँद को मुट्ठी में बंद कर सकता हूँ
बहुत आसान है यह
मुश्किल बस इतनी है
मुट्ठी खुलने पर
यह दिखाई नहीं देता।
3.
मैं
अपना लिखा भूल जाता हूँ
पर तुम्हें याद रखता हूँ
कभी बारिशों में पुकारना मुझे
मैं नम धरा की तरह
तुम्हारे सामने हरा मिलूंगा।
4.
मैं
पुकारता हूँ तुम्हें
पुकारता हूँ तुम्हें मैं
तुमने पलट कर नहीं देखा
तुम्हें चुप
अपने मन में पुकारता हूँ मैं
तुमने मन में भी पलट कर नहीं देखा।
©राकेश रोहित Rakesh Rohit