देशद्रोही

देशद्रोही

देशद्रोही

आम्ही भाकरी मागितली
तो म्हणाला,
धर्म वाचवा

आम्ही ओळख मागितली
तो म्हणाला-
कागदपत्रं दाखवा

आम्ही रोजगार मागितला
तो म्हणाला,
स्वावलंबी बना

लढतो आहोत लढाई आमची
वाचवतोयत धर्म आमचा
धर्म जे सांगतो,
आपला हक्क हिसकावून घ्या

पोलिसांच्या फाईलीत
आता आमचा परिचय
'देशद्रोही' असा आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

हमने रोटी मांगी
उसने कहा-
धर्म बचाओ 

हमने पहचान मांगी
उसने कहा- 
काग़ज़ दिखाओ 

हमने रोज़गार मांगा
उसने कहा-
आत्मनिर्भर बनो। 

लड़ रहे हैं लड़ाई अपनी
बचा रहे हैं धर्म अपना  
धर्म जो कहता है- 
अपना हक़ छीन कर लो

पुलिस की फाईलों में 
अब हमारा परिचय 'देशद्रोही' है। 

©आदित्य रहबर
Aditya Rahbar

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने