मी
माझ्या पद्धतीचा राष्ट्रवादी आहे
माझ्या पद्धतीने धार्मिक.
मी
तुमच्या पद्धतीचा हिंदू नाहीये
मला आपल्या पद्धतीने गिनू नका
समजावू नका आपल्या पद्धतीचा
मान-सन्मान-गौरव
मी अभिवादन करताना
राम-राम म्हणतो
वाटेवरती गुरूद्वारात
लंगरमध्ये जेवतो
'सत् श्री अकाल' म्हणतो
दाढी-टोपीवाल्यांचा तिरस्कार
करत नाही
तो दिवाळीच्या शुभेच्छा देतो,
मी ईदच्या.
विविधतेत एकतेचे तत्व
जे संविधानात लिहिलेले आहे
ते माझे श्लोक आहेत
ती माझी आरती आहे
त्यांचंच स्मरण आहे मला
मी तिरंगा उचलतो
तेव्हा लक्षात ठेवतो
हा राष्ट्राचा ध्वज आहे
ज्यात एकच रंग नाही
रंगांची विविधता आहे
मला धर्माबद्दल
चीड नाही
माझे पूर्वज आणि मी
या धर्माचाच भाग आहोत.
पण,
तुम्ही जेव्हा सांगता
आपल्या सनातन पद्धतीला उगाळत
की फक्त धर्म आणि धर्मच म्हणून
तेव्हा मला तिरंग्याचा अपमान झाल्यासारखा वाटतो तुमच्याकडून
तेव्हा मला धर्माचे सर्वात
मोठे शत्रू तुम्हीच वाटता
तेव्हा तुम्ही
धर्माला तिडीक बनवत असता
ऐका
धर्म जर गौरव असेल तुमचा
तर तिडीक बनवू नका त्याला
धर्म हा धर्म आहे,त्याला
पुढार्यांच्या हातात सोपवू नका
तुमचा गौरव राम आहे
माझाही आहे
पण माझा प्रथम गौरव तिरंगा आहे
मी तुमच्या पद्धतीत सामील नाही
मी माझ्या पद्धतीचा राष्ट्रवादी आहे
मला निकालात काढण्याची कारणे द्या,
अगोदर.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मेरा गौरव तिरंगा है,
राम मंदिर नही
मैं
मेरे हिसाब का राष्ट्र्वादी हूँ
मेरे हिसाब का धार्मिक
मैं तुम्हारे हिसाब का हिन्दू नही हूं
मुझे अपने हिसाब में मत गिनिए
न समझाईये अपने हिसाब से गौरव
मैं अभिवादन के वक्त राम-राम बोलता हूं
राह जाते गुरुद्वारा में लंगर खाता हूं
सत श्री अकाल कहता हूं
टोपी दाढ़ी वाले से नफरत नही करता
वह दीवाली की बधाई देता है
मैं ईद की
विविधता में अनेकता के तत्व
जो संविधान में लिखे हैं
वे मेरे श्लोक हैं
वे मेरी आरती हैं
उनका ही स्मरण है मुझे
मैं तिरंगा उठाता हूँ
तो याद रखता हूँ
यह मुल्क का झंडा है
जिसमे एक रंग नही
रंगों की विविधता है
मुझे सनातन से चिढ़ नही
मेरे पूर्वज और मैं
स्नातन का हिस्सा हैं
तुम जब कहते हो
अपने हिसाब लगाकर
कि सिर्फ सनातन,
तब मुझे तिरंगे की तौहीन करते लगते हो तुम
तब मुझे
सनातन के सबसे बड़े शत्रु तुम्हीं लगते हो
तब तुम
सनातन को चिढ़ बना देते हो
सुनो
सनातन गौरव है अगर तुम्हारा
तो चिढ़ मत बनाओ उसे
धर्म धर्म है
नेताओं के हाथ मत सौंपो
तुम्हारा गौरव राम हैं
मेरा भी हैं
मेरा पहला गौरव लेकिन तिरंगा है
मैं तुम्हारे हिसाब में शामिल नही
मैं मेरे हिसाब का राष्ट्रवादी हूं
मुझे ख़ारिज करने के तर्क लाओ पहले
©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia