अहो,चहा तयार आहे !

अहो,चहा तयार आहे !


अहो,चहा तयार आहे!


एक स्त्री
आरशात स्वतःला पाहाते
आणि आपल्या पतीला विचारतेः
'अहो, मी सुंदर आहे नं?'

पतीः
'हो सुंदर आहेस
खूप सुंदर,प्लीज, 
आता जरा चहाचं बघा.'

'नाही..आधी नीट सांगा मी सुंदर आहे ते...
तेव्हाच चहा बनवणार.'

पतीः 
'सांगितलं ना,सुंदर आहेस,
खूप सुंदर आहेस,जा प्लीज आता चहा आण.'

ती रूपगर्विता अजूनही ठामच.

'नाही...तुम्ही अजून मनापासून कुठं सांगितलंय,मनापासून सांगितलं तरच चहा! 
नाही तर
माझ्या पतीराजाच्या चहाला आज सुट्टी! 
कळलं?'
पतीने यावर काहीच उत्तर दिले नाही.

ती अडवत राहीली,
पण पती कामावर निघून गेला.

वाटेत पतीने विचार केला
की काय खरेच माझी पत्नी सुंदर आहे?
तो कुणाला विचारावं? 
या विचारानेच लाजला.

त्याने झाडाला विचारले तर काही उत्तर 
मिळाले नाही.
एखादे पानदेखील हलले नाही.
स्वतः पत्नीचा चेहरा आठवून पाहिला 
तरी काही समजू शकले नाही.

त्याने आभाळाला प्रश्न केला तर ते थोडसं हसलं,
मग
तो संध्याकाळी घरी परतला,
आणि पत्नीला म्हणाला,
होय राणी, 
तू खरोखरच सुंदर आहेस!

तीः
अहो, ऐकलं का?
चहा तयार आहे!!

मूळ हिंदी कविता
विष्णु नागर

मराठी अनुवाद
भरत यादव

4 टिप्पण्या

  1. खरं तर बायकांना थोडंसं कौतुक अपेक्षित असतं . आयुष्याचं समर्पण करायला त्या क्षणात तयार होतात . पण काही पुरुषांकडे रसिकता नसते . किंवा बायकोला खूश करावं अशी आत्मियताही . खूप साध्या गोष्टी असतात या साध्या क्षुल्लक गोष्टीतून प्रेम आपुलकी कळते .

    उत्तर द्याहटवा
  2. बायको चे कौतुक करू नये ही आपल्या पुरुषांची मानसिकता आहे. आता थोडा बदल होतो आहे समाज मनात पण अजूनही वेग कमी आहे. खरं तर थोडं कौतुक केलं की बाईला नवीन हुरूप येतो

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने