त्यांना झणका येतो !

त्यांना झणका येतो !


त्यांना झणका येतो !

विचारून घेतो
अधूनमधून,
नैतिकता धर्म आहे की
धर्मात सांगितलेलं सगळं 
नैतिक आहे?
तर झणका येतो त्यांना!

विचारून घेतो
अधूनमधून
अवतार-ईश्वर-देव 
स्वतः नव्हते नैतिक
पुढारी-धार्मिक नेतेही नाहीत
मग प्रजेत नैतिकता कशी येणार?
तर झणका येतो त्यांना!

मी विचारून घेतो जेव्हा
जन्मजात उच्चतेची भावना
दूसर्‍याला खालचा म्हणणं आहे
आणि तुम्ही उच्च-नीच करणारे
जे माणुसकी समजत नाहीत
ते नैतिकता जाणत नाहीत?
तर झणका येतो त्यांना

मी विचारून घेतो,
अस्पृश्यतेचे जनक आपण आहोत?
जगाने आपल्याकडून शिकली ना शिवाशिव?
की आपण शिकलोयत त्यांच्याकडून?
तर झणका येतो त्यांना

संतापाने गरजतात ते
फुत्कारतात आणि
म्हणतात,
गर्विष्ठ रावण आणि कंस नाही
वाचले,
तुझी काय पात्रता?

मी विचारून घेतो,
रावण आणि कंस तर घराघरात आहेत
श्रीराम आणि श्रीकृष्ण कुठे उरलेत?
तर झणका येतो त्यांना!

झणका येतो त्यांना
कारण ते धर्माला नैतिकता म्हणतात
आणि मी नैतिकतेला धर्म म्हणतो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

उन्हें गुस्सा आता है 
पूछ लेता हूँ 
गाहे बगाहे 
कि नैतिकता धर्म है या 
धर्म में कहा गया सब नैतिक है 
तो गुस्सा आता है उन्हें 

पूछ लेता हूँ 
गाहे-बगाहे 
कि अवतार/ईश्वर/देव खुद नहीं थे नैतिक 
नेता, धर्म-नेता भी
फिर अवाम में नैतिकता कहाँ से आती 
तो गुस्सा आता है उन्हें 

मैं पूछ लेता हूँ जब
कि जन्मजात श्रेष्ठता का भाव
दूसरे को नीचा कहना है
और आप ऊंच-नीच वाले 
जो मनुष्यता नही समझते 
वे नैतिकता नही जानते
तो गुस्सा आता है उन्हें

मैं पूछ लेता हूँ
कि अस्पृश्यता के जनक हम हैं ?
दुनिया ने हमसे सीखी छुआछात ?
या हमने सीखी उनसे
तो गुस्सा आता है उन्हें

गुस्से में दहाड़ते वे 
फुंफकारते हैं 
कहते हैं 
घमंडी रावण और कंस नहीं बचे 
तुम क्या चीज हो 

मैं पूछ लेता हूँ  
कि रावण और  कंस  तो घर-घर हैं 
श्री राम और श्री कृष्ण कहाँ बचे हैं 
तो गुस्सा आता है उन्हें 

गुस्सा आता है उन्हें
क्योंकि  वे धर्म को  नैतिकता कहते हैं 
और मैं नैतिकता को धर्म कहता हूँ 

©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia

मराठी शब्दार्थ
झणका-राग,संताप
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने