आपल्यातलं अंतर इतकंही नव्हतं
की तू मला हाक द्यावीस
आणि मी ती ऐकूही शकलो नसतो
आणि इतकं तर अजिबातच नव्हतं
की तू एखादं पत्र लिहावंस
आणि ते मजपर्यंत पोहोचलंच नसतं
तू नाही लिहिलंस एखादं पत्र
जेव्हा पत्रं अजूनही प्रचलित होती
आणि आवश्यक पत्रं पोहोचविण्यासाठी
पोस्टमन पण माझ्या घरी येत असे.
मी तुझं ते अखेरचं पत्र
बुकमार्क प्रमाणे जपलं आहे
जे प्रत्येक प्रकरणानंतर पुढे सरकविण्याआधी
मी पुन्हा एकदा वाचत असतो.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
आखिरी खत
हमारे बीच फासला इतना भी नहीं था
कि तुम मुझे पुकारतीं
और मैं सुन ही न पाता.
और इतना तो बिल्कुल नहीं था
कि तुम कोई खत लिखतीं
और वो मुझतक पहुंचता ही नहीं.
तुमने नहीं लिखी कोई चिठ्ठी
जबकि खत अभी चलन में थे
और जरूरी चिट्ठियां पहुंचाने-
डाकिया भी मेरे घर आता रहता था.
मैंने तुम्हारा वो आखिरी खत
बुकमार्क की तरह रखा है
जिसे हर चैप्टर के बाद आगे सरकाने से पहले
मैं एक बार फिर से पढ़ लेता हूं.
©Ashok Kumar
अशोक कुमार