गणतंत्र

गणतंत्र


 गणतंत्र
/ विरेंदर भाटिया

हे जनते
तू जन आहेस
जनांशी जन भेटले
तर ते गण होते

गणांसाठीच आहे हे अवघे तंत्र
त्या तंत्राचे भाग आहेत
तमाम लाल निळे बत्तीवाले
यांना सलाम ठोकू नकात
ते तुमचे सेवक आहेत

गणाच्या तंत्राला क्रियाशील करणार्‍या
ग्रंथाच्या परिघात आहे यांची मजल
यांची हद्द जाणून घ्या
यांच्यावर नजर राखा
नागवा करा यांचा दुराग्रह

नाकर्त्या भागांना चिन्हांकित करा
गंजलेल्या भागांना बदलून टाका
तंत्राला ठणठणीत ठेवा
हे गणतंत्र आहे
गणांच्यासाठी आहे
गणांकडून चालवले जाते
याला रखवालदाराच्या हातात सोपवून
दीर्घकाळ झोपा काढू नका

विश्वास ठेवा
ते रात्र होण्याची वाट बघणार नाहीत
फक्त गण झोपण्याच्या प्रतिक्षेत आहेत ते
आपला देश त्यांनी आपण असताना 
विकून टाकला तर आपल्या असण्याला 
काही अर्थ नाहीये,
लेकराबाळांना ऐकवू नका मग
आपल्या पोकळ शौर्याच्या गोष्टी
याच्यापूर्वी की ते
तोडून मोडून टाकतील गण
छिन्नविच्छिन्न करतील तंत्र
जागे व्हा
जागे व्हा
जागे व्हा

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

गणतन्त्र

हे जनता
तुम जन हो
जन से जन मिले
तो गण होता है
गण के लिए है ये समूचा तन्त्र
 
उस तन्त्र के पुर्जे हैं 
तमाम लाल नीली बत्तियों वाले
इन्हें सलाम मत ठोकिये
ये आपके सेवक हैं
गण के तंत्र को चलायमान करने वाली
पुस्तक की हद के भीतर है इनकी उड़ान
इनकी हद जानिए
इनपर नजर रखिए
नँगा करिये इनकी हठधर्मिता 
नकारा पुर्जो को चिन्हित करिए
जंग लगे पुर्जो को बदल डालिये
तन्त्र को दुरुस्त रखिये
ये गणतंत्र है
गण के लिए है
गण के द्वारा है
इसे चौकीदार के हाथ सौंप 
लम्बी तान मत सोइए
यकीन मानिये
ये रात होने का इंतज़ार नही करेंगे
बस गण के सोने की ताक में  हैं
आपका मुल्क ये आपके होते बेच गए तो
आपके होने का कोई अर्थ नहीं,
बच्चों को मत सुनाना फिर
अपनी थोथी बहादुरी के किस्से
इससे पहले कि ये
तोड़ दें गण
छिन्न भिन्न कर दें तंत्र
चेत जाईये
चेत जाईये
चेत जाईये

©वीरेंदर भाटिया
virendar Bhatia

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने