बिचार्यांचे हिंदूराष्ट्र!
त्यांनी मारले
आणखी -आणखी मारले
आणखी,आणखी,आणखी मारले लोक
त्यांनी मारण्यात पन्नासहून अधिक वर्षं घालवली
तरिही झालं नाही,
होय होऊच शकलं नाही,
बिचार्यांचे हिंदूराष्ट्र
त्यांनी रथ चालवले आणि घरे जाळली
त्यांनी मशिदी पाडल्या आणि मंदिरं उभारली
त्यांनी साधूचा वेष धारण केला
त्यांनी राष्ट्रवादाचे प्रदर्शन करण्यात डोपिंगविना रौप्य
आणि सुवर्ण पदकं पटकावली
त्यांनी नैतिकतेचा शंखनाद
करून करून लोकांचे कान फोडले
त्यांनी मंदिरांमध्ये महाआरत्या केल्या
त्यांनी हत्याकांडाचा दिवस
'शौर्य दिवस' म्हणून साजरा केला
त्यांनी खोटारडेपणाचे एकापेक्षा एक अलिशान इमले उभे केले
त्यांनी भावनेच्या गंगायमुना आणि एवढेच नाही सरस्वतीसुद्धा वाहवून दाखविल्या
त्यांनी दगाबाजीने सगळ्या विश्व सौंदर्य स्पर्धा जिंकल्या
पण बनलं नाही,
होय बनूच शकले नाही
बिचार्यांचे हिंदूराष्ट्र
त्यांनी भगतसिंहांच्या बाजूला हेडगेवार बसवले
त्यांनी महात्मा गांधींजवळ गोळवलकरांसाठी जागा केली
त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ गाद्यागिरद्या लावून श्यामाप्रसाद मुखर्जींसाठी
जागा बनवली
त्यांनी विवेकानंदांना धरलं
सुभाषचंद्र बोस यांना पकडलं
त्यांनी कबीराला आपटलं
नेहरूंना दिला झटका
पण बनलंच नाही,
हो हो अजिबातच नाही
हाय रे बनूच शकलं नाही
हो हो
काय करतील गरीब
कुणीतरी मदत करा यांची
हा हा हे काय झालं रे यांच्याबरोबर
हो हो हाय हाय
हाय हाय हो हो
ओह ओह अरे व्वा
बनूच नाही शकलं
बिचार्यांचे
गरिबांचे
अडचणींच्या झापडा खाणारांचे
काळी टोपी,केशरी पटकेवाल्यांचे
हिंदू राष्ट्र
सांगतायत की आता ते ग्लोबल टेंडर काढणार आहेत म्हणे
अटलबिहारी वाजपेयी त्यांच्याशी सहमत आहेत म्हणे
तर ही जोरदार गोष्टंंय
बरोब्बर याचप्रमाणे बनेल आमचे हिंदूराष्ट्र!
करा करा आणखी करा
करत राहा..ध्वजाला प्रणाम!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बेचारों का हिंदू राष्ट्र
उन्होंने मारे
और -और मारे
और ,और, और मारे लो
उन्होंने मारने में 50 से भी ज्यादा साल लगा दिए
फिर भी बना नहीं, हाँ जी बन ही नहीं सका
बेचारों का हिंदू राष्ट्र
उन्होंने रथ चलाए और घर जलाए
उन्होंने मस्जिदें गिराईं और मंदिर बनाए
उन्होंने त्रिशूल उठाए और सरकारें गिराई
उन्होंने साधु का वेश धरा
उन्होंने राष्ट्रवाद के प्रदर्शन में बिना डोपिंग के
रजत और स्वर्ण पदक जीत लिए
उन्होंने नैतिकता के शंख फूँक कर
लोगों के कान फोड़ डाले
उन्होंने मंदिरों में महाआरतियाँ कींं
उन्होंने हत्याकांड को 'शौर्य दिवस ' के रूप में मनाया उन्होंने झूठ के एक से एक शानदार महल खड़े किए उन्होंने भावनाओं की गंगा -यमुना और यहाँ तक कि सरस्वतियाँ तक बहाकर दिखा दीं
उन्होंने धोखे की समस्त विश्व सौंदर्य प्रतियोगिताएं जीत लीं
मगर बना नहीं, हां बन ही नहीं सका
बेचारों का हिंदू राष्ट्र
उन्होंने भगत सिंह की बगल में हेडगेवार को बैठाया उन्होंने महात्मा गाँधी के पास गोलवलकर के लिए स्थान बनाया
उन्होंने बाबासाहेब अंबेडकर के पास गाव- तकिया लगाकर
श्यामा प्रसाद मुखर्जी के लिए जगह बनाई
उन्होंने विवेकानंद को झपटा
सुभाष चंद्र बोस को लपका
उन्होंने कबीर को पटका
नेहरू को दिया करारा झटका
मगर बना ही नहीं, हां हां बिल्कुल भी नहीं
हाय- हाय बन ही नहीं सका
हो -हो ,क्या करें ये गरीब
कोई तो मदद करो इनकी
हा- हा ,ये क्या हुआ रे इनके साथ
हो हो, हाय -हाय
हाय- हाय, हो- हो
आह-आह,अरे वाह
बन ही नहीं सका
बेचारों का
गरीबों का
मुसीबत के मारों का
काली टोपी, केसरिया पटकेवालों का हिंदू राष्ट्र
बताते हैं कि अब वे ग्लोबल टेंडर निकालेंगे
अटल बिहारी वाजपेयी उनसे सहमत हैं कि
यह हुई न कोई बात
ठीक इसी तरह बनेगा हमारा हिंदू राष्ट्र।
करो करो और करो,करते चले जाओ
ध्वज प्रणाम।
© विष्णु नागर
Vishnu Nagar
(2006 में प्रकाशित कविता संग्रह ' हँसने की तरह रोना'
से ')