प्रेम करून तरी बघ!
❤️
हिजाब घातलात तर मारू
जीन्स नेसलात तर मारू
बुरखा घातलात तर मारू
पाय दाखवलेत तर मारू
घुंघट हटवलात तर मारू
बोललात तर मारू!
नाही बोललात तर मारू!
खिदळलात तर मारू
मोबाईल बाळगलात तर मारू
प्रेम केलंत तर मारू
नोकरी केलीत तर मारू
घरी राहिलात तर मारू
या निमित्ताने! त्या निमित्ताने मारू!
धर्माच्या नावाने मारू!
अधर्माच्या नावाने मारू!
तुम्ही मारणार नक्कीच
झाकू किंवा उघडू दे काहीही
मी असण्याबद्दलच माराल
जन्मण्याआधीच माराल!
सत्य हे आहे की तुम्हाला
आमचा हिजाब घाबरवत असतो
आमची जीन्स घाबरवत असते
घुंघट उघडणेही घाबरवत असते
आमचा बुरखाही घाबरवत असतो
आमचे गप्प राहाणेही घाबरवत असते
बोलणेदेखील घाबरवत असते
आमचे शिकणेही घाबरवत असते
आमचे न शिकणेही घाबरवत असते
नोकरी करणेही घाबरवत असते
आणि घरी राहाणेही घाबरवत असते
आमचं खळखळून हसणंही घाबरवतं
गप्प असणंसुद्धा घाबरवत असतं
गोया आम्ही माणसं नव्हे मुठीत बंद
तुझ्या भीतीचं दूसरं नाव आहे
पण ते दिवस दूर नाहीत जेव्हा
मार! मार! मार!
होईल पलटवार
पलटवार
खार खार खार हा मार तो मार
हा मार तो मार
तेव्हा लढाई बरोबरीची होईल!
तेव्हा झुंजीची मजा येईल
अरे भेत्रट पुरूषा भिवू नकोस,
घाबरू नकोस
आम्ही माणसं आहोत
मूठ उघड हात मिळव
सोबत चालून तरी पाहा
स्वतःमधून बाहेर पडून तरी पाहा
आमच्या डोळ्यांनीही पाहा
आयुष्य फुलांप्रमाणे दरवळताना तरी पाहा
वेड्या!
दोनाच्या चार नजरा करून तरी बघ
अरे अभाग्या!
प्रेम करून तरी बघ!!
❤️
मराठी अनुवाद
भरत यादव
bharat yadav
❤️
मूळ हिंदी कविता
अरे अभागे !
प्रेम करके तो देख !
हिजाब पहना तो मारेंगे
जींस पहना तो मारेंगे
बुर्का पहना तो मारेंगे
टाँगें दिखाई तो मारेंगे
घूँघट हटाया तो मारेंगे
बोली तो मारेंगे !
न बोली तो मारेंगे !
खिलखिलाई तो मारेंगे
मोबाइल रखा तो मारेंगे
प्रेम किया तो मारेंगे
नौकरी की तो मारेंगे
घर पर रही तो मारेंगे !
इस बहाने ! उस बहाने मारेंगे !
धर्म के नाम पर मारेंगे !
अधर्म के नाम पर मारेंगे !
तुम मारोगे जरूर
ढकूं या उघाड़ूँ कुछ भी
मेरे होने के लिए ही मारोगे
जनम के पहले ही मारोगे !
सच यह है कि तुम्हे
हमारा हिजाब भी डराता है ! हमारी जींस भी डराती है !
घूँघट उठाना भी डराता है ! हमारा बुर्का भी डराता है !
हमारा चुप रहना भी डराता है ! बोलना भी डराता है !
हमारा पढ़ना भी डराता है ! ना पढ़ना भी डराता है !
नौकरी करना भी डराता है ! और घर में रहना भी डराता है !
हमारा खिलखिलाना भी डराता है ! चुप रहना भी डराता है !
गोया हम इंसान नहीं मुट्ठी में बंद तुम्हारे डर का दूसरा नाम हैं !
पर वे दिन दूर नहीं जब
मार ! मार ! मार ! होगा पलटवार !
पलटवार !
खार ! खार ! खार ! ये मार ! वो मार !
ये मार ! वो मार !
तब लड़ाई बराबरी की होगी ! तब आएगा लड़ाई का मज़ा !!
अरे कायर पुरुष मत डर ! मत डर !
हम इंसान है ! मुट्ठी खोल हाथ मिला !
साथ चलकर तो देख ! अपने से निकल कर तो देख !
हमारी आँख से भी देख !
ज़िंदगी को फूलों की तरह महकते तो देख !
पागल ! नजरों को दो-चार करके तो देख !
अरे अभागे ! प्रेम करके तो देख!
❤️
©सरला माहेश्वरी