इतके चांगले होते त्यांचे नशीब
की गुलामीकडे घेऊन जाणार्या रेल्वेगाड्यांमध्ये
मिळालीये त्यांना
गांड टेकण्याची जागा
इतके चांगले होते त्यांचे नशीब
की कुणी नाही मानले
त्यांना देशद्रोही वा दहशतवादी
इतके चांगले होते त्यांचे नशीब
की पाकिटमारांनी त्यांना अस्पृश्य मानले आणि सुखरूप राहिले त्यांचे स्वस्त पण कॅमेरेवाले फोन त्यांच्या मळक्या कपड्यांमध्ये कुठे तरी
वाजता वाजता
इतके चांगले होते त्यांचे नशीब
की सुखरूपपणे तिथे पोहोचल्याची बातमी होती त्यांच्याजवळ जिथे खूप धूळ होती आणि खूप गर्दी
दररोज काही आजारी आणि काही जीवंत सोडून देत होती--
भक्त बनण्यासाठी
याला चांगले नशीब नाही तर
आणखी काय म्हणणार
कारण
सत्ता बदलत होत्या
आणि परतण्याचे पर्याय खुले राहात होते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
और क्या कहेंगे
इतनी अच्छी थी उनकी तक़दीर
कि ग़ुलामियों की ओर ले जाती रेलगाड़ियों में
मिल गई उन्हें गाँड टिकाने की जगह
इतनी अच्छी थी उनकी तक़दीर
कि किसी ने नहीं समझा
उन्हें देशद्रोही या दहशतगर्द
इतनी अच्छी थी उनकी तक़दीर
कि जेबकतरों ने उन्हें अछूत माना
और सलामत रहे उनके सस्ते मगर कैमरेवाले फ़ोन
उनके मैले कपड़ों में कहीं बजते हुए
इतनी अच्छी थी उनकी तक़दीर
कि सकुशल वहाँ पहुँच जाने की ख़बर थी उनके पास
जहाँ बहुत धूल थी और बहुत भीड़
ये बहुत धूल और बहुत भीड़
रोज़ कुछ बीमार और कुछ ज़िंदा छोड़ देती थी—
भक्त बनने के लिए
इसे अच्छी तक़दीर नहीं तो और क्या कहेंगे
कि सत्ताएँ बदल जाती थीं
और लौटने के विकल्प खुले रहते थे।
©अविनाश मिश्र
Avinash Mishra