चूक जनतेची होती !

चूक जनतेची होती !

चूक जनतेची होती!

काही लोक
बॅंकांच्या रांगेत मेले उभ्या उभ्या
चूक त्यांची होती,
रग नव्हती जर पायात
तर का उभे राहिले बरं?

काही लोक स्थलांतरामुळे मेले
लोहमार्गावर अस्ताव्यस्त मिळाल्या 



त्यांच्या भाकरी आणि देहाचे तुकडे

चूक त्यांचीच होती
लोहमार्ग म्हणजे सुस्तावून पडण्याची 
जागा थोडीच आहे?
कुणी जीवंत वाचता त्यातला तर 
सांगता की सुस्तावले नव्हते ते
सामुहिक आत्महत्या होती ती.

काही लोक मेले सरकारकडून 
हक्क-अधिकार मागताना
हक्क कुठल्या गोष्टीचा?
जेव्हा निवडलं आहे तर देव 
माना त्याला
देवावर विश्वास ठेवा
अविश्वासामुळे मेले ते सगळे
त्यांचीच चूक होती!

काही लोक महामारीत मेले
त्यांची तर नक्कीच चूक होती
जर फुफ्फुसे सहन नाहीत 
करत महामारीला
तर का सापडले तडाख्यात?

जनता तर जनार्दन होती
दणादण मानायला लागली की
चूक त्यांचीच होती
त्यांनी चूक मान्य केली आपली
आणि आॅक्सिजन नाही मागितले
त्यांनी चूक मान्य केली आपली
आणि शांततेत मरण पावले
त्यांनी चूक मानली आपली
आणि गुपचूपपणे सोडून आले 
आप्तजनांना गंगेच्या प्रवाहात

गंगा रडली
देव नाही रडला

गंगा आश्चर्यचकित होती
की देव प्रलय निवडतो आहे
देव निर्धास्त होता की मरूनसुद्धा
जनता त्यालाच देव मानते आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

गलती जनता की थी

कुछ लोग
बैंक की लाइन में मर गए खड़े खड़े
कुसूर उनका था,
जोर नही था गर पैरों में
तो क्यों खड़े हुए

कुछ लोग पलायन में मर गए
रेलवे ट्रैक पर गडमड मिली उनकी रोटियां और बोटियाँ
कुसूर उनका ही था 
रेलवे ट्रैक सुस्ताने की जगह थोड़े ही है,
कोई  जिंदा बचा होता उनमे तो बताता
कि सुस्ताये नही थे वे
सामूहिक आत्महत्या थी वह

कुछ लोग मर गए सरकार से हक मांगते हुए
हक किस बात का
जब चुना है तो ईश्वर समझो उसे
ईश्वर पर विश्वास करो
अविश्वास में मरे वे सब
उनकी ही गलती थी

कुछ लोग महामारी में मर गए
उनका तो पक्का ही कुसूर था
जब फेफड़े नहीं झेलते महामारी
तो क्यों आये चपेट में

जनता जो जनार्दन थी
दनादन मानने लगी कि भूल उनकी ही थी
उन्होंने भूल मानी अपनी और ऑक्सीजन नही मांगी
उन्होंने भूल मानी अपनी और शांति से मर गए
उन्होंने भूल मानी अपनी
और चुपचाप बहा आये परिजन गंगा में

गंगा रोई
ईश्वर नही रोया

गंगा हैरत में थी
कि ईश्वर प्रलय चुन रहा है
ईश्वर मुतमईन था कि मर कर भी जनता
उसे ही ईश्वर मान रही है। 

©वीरेंदर भाटिया
Verendar Bhatia
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने