लाईटहाऊस सारखी तू

लाईटहाऊस सारखी तू

लाईटहाऊस सारखी तू

ही जी रात्र आहे
ठाऊक नाही किती रातींचा अंधार 
सामील आहे हिच्यात
ही रात्र
जिने दिवसालाही डसले आहे

मी किती जोराने चिरकू
की कुणी ऐकावे येथे
काळोख्या रात्रीचे चित्कार
काय तुझ्यापर्यंत पोहोचतायत

वचन तर हे होतं की मी गाईन आणि 
झाडं प्रदक्षिणा घालतील
चांदणं पसरेल प्रत्येक अंगणात
झाडांच्या लांब लांब सावल्यांसाठी
गव्हाच्या पिकल्या लोंब्या पाहून हसेल चैतातला सूर्य
हे वचन होतं

मी बाहू पसरेन
आणि पुढे येतील कैक हात प्रेमाचे
हात,ज्यांच्या बोटांच्या पेरांतून  निघतील लाखो काजवे
हात,ज्यांचे चेहरे नसतील
हात,ज्यांच्या माथ्यावर लिहिलेला नसेल कुठलाही समर्पणभाव
हात, हातांशी मिळून लिहितील नव्या 
सकाळची गाथा

मी किती जोराने ओरडावे
की माझ्या आवाजाचे एखादे टोक तुझ्यापर्यंत पोहोचावे
मी या काळोख्या रात्री या बेटात अडकलो आहे
रात्र शतकांची प्रदीर्घ वाटते आहे
आणि नाही फिरकत कुठलेही जहाज इकडून
मी किती वेगाने वीज फेकावी
की झगमगून उठतील समुद्राच्या लाटा
की त्या धडकतील एखाद्या लाईटहाऊसला
तू कुठल्यातरी लाईटहाऊस मध्ये बसून माझ्या जहाजाची प्रतिक्षा करावीस

मी अडकलोय या नरभक्षक बेटावर
इथे सगळे बहिरे आहेत
डोळ्यांवर अनेक रंगांचे चष्मे तर आहेत परंतू खोटे आहेत,
हे आंधळे आहेत
यांच्या शरीरावर फक्त दात आहेत लांब वा केवळ पंजे आहेत

माझा विश्वास बुडतो आहे
माझे जहाज वाचव तू
मी काही स्वप्नं आपल्या खिशात भरून घेतलेयत
तू भेट म्हणजे यातून एक नवी सकाळ उगवू या

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

लाइट हाउस सी तुम

यह जो रात है
जाने कितनी रातों का अंधेरा शामिल है इसमें
यह रात
जिसने दिन को भी डस लिया है

मैं कितनी जोर से चिल्लाऊं
कि कोई सुन ले यहां
स्याह रात की चीखें
क्या तुम तक पहुंचती हैं

वादा तो ये था कि मैं गाऊंगा और दरख्त तवाफ करेंगे
चांदनी छिटक आएगी हरेक आंगन में
दरख्तों के लंबे-लंबे साये लिए
गेहूं की पकी बालियों को देख मुस्कराएगा चैत का सूरज
ये वादा था

मैं बाहें फैलाऊंगा
और बढ़े आएंगे कई हाथ मुहब्बत वाले
हाथ, जिनकी उंगलियों के पोरों से निकलेंगे जुगनू लाखों
हाथ, जिनके चेहरे नहीं होंगे
हाथ, जिनकी जबीं पर नहीं लिक्खा होगा कोई सजदा
हाथ, हाथ से मिलकर लिखेंगे नई भोर का अफसाना

मैं कितनी जोर से चीखूं
कि मेरी आवाज का कोई सिरा तुम तक पहुंचे
मैं इस स्याह रात में इस टापू पे फंस गया हूं
रात सदियों तवील लगती है
और नहीं गुजरता कोई जहाज इधर से
मैं कितनी तेज बिजलियां फेंकूं
कि जल उठें समंदर की लहरें
कि वे टकरा जाएं किसी लाइट हाउस से
तुम किसी लाइट हाउस में बैठी मेरे जहाज का इंतजार करना

मैं फंस गया हूं इस आदमखोर टापू पर
यहां सभी बहरे हैं
आखों पर कई रंग के चश्मे तो हैं मगर
झूठे हैं, ये अंधे हैं
इनके शरीर पर बस दांत हैं लंबे
या कि बस पंजे हैं

मेरा यकीन डूब रहा है
मेरा जहाज बचा लो तुम
मैंने कुछ ख्वाब अपने खीसों में भर लिए हैं
तुम मिलो तो इनसे एक सवेरा उगाएंगे

©फिरोज खान
Firoj Khan 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने