आम्ही चिखलातले कवी होतो

आम्ही चिखलातले कवी होतो

आम्ही चिखलातले कवी होतो

आम्ही राजधानीत बसून लिहिणारे लोक नव्हतो
आम्ही गुडघ्यापर्यंत चिखलात रूतलेले लोक होतो
आम्ही धानपेरणी करताना लिहित होतो कविता

गव्हाच्या भुर्‍या लोंब्या पाहून
थरथरून जात असू
त्याचक्षणी डोळ्यांच्या कडांमधून टपकत असायची कविता

मोहरीची पिवळी फुलं बघून आम्ही पहिल्यांदा प्रेमकवितेची चव जाणली
रानफुलांनी कवितांना सुगंधीत केलं
काट्यांमध्ये सावधपणे त्यांना स्थापित होणंं शिकवलं

आम्ही लाकडाच्या चूलीवर शिजणारा भात होतो
आम्ही भगोण्यात शिजणारी डाळ होतो
आम्ही विस्तवावर शिजवलेले बटाटे,मिरची आणि एक चिमुटभर मीठ होतो
आम्ही सावकारानं हासडलेली शिवी होतो

आमच्यासाठी कुठला मंच नव्हता
मंचाच्याखाली आमच्यासाठी कुठली खुर्ची टाकलेली नव्हती

आम्ही रांगेच्या शेवटी उभे राहून सभ्य,शालीन,पारंगत कवींकडून मजूर,दलित,शोषितांवर कविता ऐकत होतो

आम्ही ज्येष्ठाच्या दुपारी तापणारे 
लोक होतो
आम्ही आषाढातील पावसात भिजणारे लोक होतो
आम्ही दान-भीकेत आलेले 
लोक होतो
आमच्या वाट्याचे सुख शोषून 
घेण्यात आले होते
आम्ही दुःखाच्या मागे पळणारे 
धावक होतो

आमच्या नशिबी पहिली रांग 
उपलब्ध नव्हती
आम्ही रांगेत शेवटी उभे राहाणारे लोक होतो

आम्ही असभ्य आणि 
अशिष्ट लोक होतो
आम्हांला अंगभर कापड पोटभर जेवण कधी नाही मिळाले
मिळालेल्या चिटोर्‍यांवर आम्ही रोज कविता लिहित होतो
आम्ही दोनजणांची भाकरी कमावत कमावत कविता लिहित होतो
एक बैल मारला गेला तर त्यांच्या जागी शेत नांगरणारे आम्ही 
लोक होतो
आम्ही सतत शेता-रानात उभे राहून राहून कविता लिहित होतो

आता कविता पक्व झाल्यात,
त्या संसदेत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

हम कीचड़ के कवि थे

हम राजधानी में बैठकर लिखने वाले लोग नहीं थे 
हम घुटनों तक कीचड़ में धँसे लोग थे 
हम धनरोपनी करते हुए लिख रहे थे कविता 

गेहूं की भूरी बालियों को देख सिहर उठते थे 
उसी वक्त आँखों के कोर से ढुलक आती थी कविता 

सरसों के पीले फूल देखकर हमने पहली प्रेम कविता का स्वाद जाना
जंगली फूलों ने कविताओं को सुगंधित किया 
कांटों में सावधानी से उन्हें स्थापित होना सिखाया 

हम लकड़ी के चूल्हे पर पकने वाले भात थे 
हम डेगची में सीझने वाले दाल थे
हम आग पर पकाए गए आलू, मिर्च और एक चुटकी नमक थे
हम महाजन के दिए गाली थे 

हमारे लिए कोई मंच नहीं था 
मंच के नीचे हमारे लिए कभी कोई कुर्सी नहीं लगाई गई थी 

हम पंक्ति के आख़िर में खड़े होकर सभ्य,शालीन, सलीकेदार कवियों से मजदूरों, दलितों, शोषितों पर कविताएँ सुन रहे थे 

हम जेठ की दुपहरी में तपने वाले लोग थे 
हम आषाढ़ के बारिश में भीगने वाले लोग थे 
हम दान-खैरात में आए लोग थे
हमारे हिस्से का सुख सोख लिया गया था
हम दुखों के पीछे भागते धावक थे 

हमारे माथे पर पहली पंक्ति मयस्सर नहीं थी
हम पंक्तियों के आख़िर में खड़े होने वाले लोग थे 

हम असभ्य और अशिष्ट लोग थे
हमें तन भर कपड़ा जी भर खाना कभी नहीं मिला
मिले चीथड़ों पर हम रोज़ कविताएँ लिख रहे थे
हम दो जून की रोटी मुहैया करते-करते कविताएँ लिख रहे थे
एक बैल के मारे जाने पर उनकी जगह खेत जोतने वाले लोग थे
हम लगातार खेतों में खड़े हो-होकर कविताऍं लिख रहे थे 

अब कविताएँ पक चुकी हैं
वह संसद पहुंचने के लिए तैयार है

©ज्योती रीता
Jyoti Rita
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने