गुलाब
🌹
माणूस जेव्हा झोपतो
तेव्हा प्रेतासारखा असतो
बडबडतो
तेव्हा मधमाशांसारखा
जेव्हा खात असतो
तेव्हा करडू दिसतो
जेव्हा प्रवासावर निघतो
तेव्हा दिसतो घोड्यासारखा
जेव्हा कधी तो
खेटून उभा असतो खिडकीला
आणि पावसासाठी प्रार्थना करतो...
वा जेव्हा तो पाहातो एखादे लाल गुलाब
आणि सैरभैर होते त्याचे मन
देण्यासाठी ते लाल गुलाब
कुणाच्यातरी हातात
केवळ तेव्हा तो असतो
माणूस.
🌹
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
🌹
हिंदी अनुवाद
🌹
ग़ुलाब
🌹
आदमी जब सोए
तो लाश जैसा होता है।
बतियाए
तो मधुमक्खी जैसा।
जब खाए
तो मेमने सा दिखता है।
जब यात्रा पर निकले
तो लगता है घोड़े जैसा।
जब कभी वह
सटकर खड़ा हो खिड़की से
और बारिश की दुआएँ करे...
या जब वह देखे कोई लाल ग़ुलाब
और मचल जाए उसका मन
थमाने को वह लाल ग़ुलाब
किसी के हाथों में
केवल तभी होता है
वह आदमी।
🌹
मूळ इराणी कविता
फरीदे हसनजादे मोस्ताफावी
Farideh Hasanzadeh Mostafavi
🌹
हिंदी अनुवाद
यादवेंद्र
Yadvendra
🌹🌹🌹