तुम्ही खोटे बोलताय!

तुम्ही खोटे बोलताय!

तुम्ही खोटे बोलताय!

तुम्ही सांगता की
ईश्वर एकच आहे
तुमचाही आणि त्यांचाही
मग असं का होत नाही?
की तुम्ही घरातून बाहेर पडावे
कधी मशिदीत जावे कधी मंदिरात
कधी गुरूद्वारात तर कधी चर्चमध्ये
प्रत्येक ठिकाणची हालहवा विचारावी
आपले सांगावे दूसर्‍यांचे ऐकावे

तुम्ही असे नाही करत
तुम्ही एकाच ठिकाणी जाता
एकच पूजा करता
एकसारख्याच लोकांसोबत बसता-उठता
इतर लोकांचा
केवळ यासाठी तिरस्कार करता
कारण त्यांचा ईश्वर तुमचा ईश्वर नाही
तुमची मंदिरे मशिदी चर्चेस
दूसर्‍यांमुळे अपवित्र होतात
तुम्ही खोटे बोलताय
तुमचा ईश्वर फक्त
तुमचा आहे
तुम्ही त्याला कोंडून ठेवले आहे

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

तुम झूठ बोलते हो

तुम कहते हो 
ईश्वर एक है 
तुम्हारा भी और उनका भी
फिर ऐसा क्यों नहीं होता 
कि तुम घर से निकलो 
कभी मस्जिद जाओ कभी मंदिर 
कभी गुरुद्वारे कभी गिरजाघर 
हर जगह हालचाल लो 
अपनी कहो दूसरों की सुनो

तुम ऐसा नहीं करते 
तुम एक ही जगह जाते हो 
एक ही पूजा करते हो 
एक से लोगों के साथ बैठते हो 
दूसरे लोगों से 
सिर्फ इसलिए नफ़रत करते हो 
कि उनका ईश्वर तुम्हारा ईश्वर नहीं
तुम्हारे मंदिर मस्ज़िद गिरजे 
दूसरों से अपवित्र हो जाते हैं 
तुम झूठ बोलते हो 
तुम्हारा ईश्वर सिर्फ
तुम्हारा है 
तुमने उसे क़ैद कर रखा है।

©संजीव कौशल
Sanjeev Koushal
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने