युद्ध आणि राजा

युद्ध आणि राजा

युद्ध आणि राजा

पहिला वार राजाच्या आदेशाने झाला
त्यानंतर जी काही शस्त्रं चालली
ती आत्मरक्षणासाठी चालविली सैनिकांनी
चालविली नसती तर मारले गेले असते प्रतिहल्ल्यात

युद्धाचा उन्माद राजांच्या डोक्यात होता
राजे जे युद्धभूमीवर नव्हते उपग्रहांकडून घेण्यात येणार्‍या संहाराच्या ताज्या
छायाचित्रांना आपल्या कक्षातील
मोठ्या स्क्रीनवर मनपसंत व्हिस्कीबरोबर जे चवीने पाहात होते.

राजे जे कारखान्यांमध्ये 
घडवत होते
पदके
भविष्यकाळात आयोजित होणार्‍या
शौर्यपुरस्कार समारंभात
अनाथ आणि विधवांना
वितरीत करण्यासाठी

राजे जे कुठल्याही आणीबाणीच्या काळात
कुठल्याशा अनोळखी ठिकाणी जाऊन उघडणार्‍या गुप्त भुयाराच्या प्रवेशद्वाराचे एकुलते एक जाणकार होते

ज्या ज्या राजांना जेव्हा
शांतीकाळात आपली उंची 
थिटी वाटायला लागली तेव्हा 
त्यांनी युद्धे जाहीर करून टाकली....!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

पहला वार राजा के आदेश पर हुआ
उसके बाद जो भी हथियार चले
आत्मरक्षा मे चलाये सैनिकों ने 
नही चलाते तो मारे जाते प्रतिवार मे 

युद्ध का उन्माद राजाओं के दिमाग मे था
राजा जो युद्धभूमि मे नही थे
जो सैटेलाइट से ली जा रही 
संहार की ताज़ा तस्वीरों को
अपने कमरे की बड़ी सी स्क्रीन पर 
मनपसन्द व्हिस्की के साथ 
चाव से देख रहे थे 

राजा जो कारखानों मे ढलवा रहे थे तमगे
भविष्य मे आयोजित होने वाले
वीरता पुरस्कारों मे 
अनाथों और विधवाओं मे
वितरित करने के लिये 

राजा जो किसी भी आपात स्थिति मे
किसी अनजान जगह जाकर खुलने वाली
खुफिया सुरंगों के मुहाने के
इकलौते राज़दार थे 

राजा जिन्हें जब 
शान्ति मे अपना कद छोटा होता जान पड़ा
तो उन्होंने युद्ध घोषित कर दिए......।

©योगेश ध्यानी
Yogesh Dhyani
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने