🌿
एक
पाहाल
एक दिवस
थकून जाईल हे जग
स्वतःशी लढता-लढता
आणि
मागेल
मंदिर-मशिदीऐवजी
एखाद्या स्त्रीकडून 'भाकरी'!
🌱
दोन
या वांझोट्या काळातदेखील
तू शिल्लक राखावास
हृदयात
कुठलासा
एखादा कोपरा
जिथे फुलून यावीत
शुभ्र रंगाची फुले!
🌱
तीन
लक्षात ठेवा
लढून कधी
संपली नाही लढाई
परंतू संपून गेले ते
जे लढत होते!
🌱
चार
अराजकाच्या काळात
प्रकाशापेक्षाही
वेगवान होत असते
ध्वनीची गती
विचार करा
की, तुमचे शब्द
कुठल्या दिशेने जात आहेत!
🌱
पाच
आता तर
दगडामागे दगड
फेकताहेत लोक
थोडेसे थांबू द्या!
जे तूला पाहायचे आहे
स्वतःला पाण्यामध्ये!
🌱🌱
मूळ हिंदी कविता
नरेश गुर्जर
Naresh Gurjar
🌱
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav