सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग!
🚩
शिवनिंदा कानी
पडली तरिही
कशी नाही काही
हालचाल

उसळेना रक्त
झाले जणू थंड
महाराष्ट्र षंढ
झाला काय?

गडकिल्लेदुर्ग
पुसती सवाल
विझली मशाल
संघर्षाची?

संघाने कपट
पेरले सर्वत्र
शिवशिव्यास्तोत्र
प्रचारती

मराठ्यांचे शौर्य
म्हणे कृपा भटी
संघाचा कपटी
जुना डाव

त्याच कपटाला
उच्चारी भगत
शिवनिंदा व्यक्त
करू झाला

हिंदवी स्वराज्य
कुण्या न जातीचे
कुण्याही धर्माचे
नव्हते गा

लढाऊ जमात
मावळ्यांची जात
निष्ठावंत फक्त
स्वराज्याशी

शाहजीचा लाल
जिजाऊचा पुत्र
छत्रपती मात्र
रयतेचे

जाणण्या महत्ता
शिवाजी नावाची
धूळ सह्याद्रीची
व्हावी लागे

रेशीमबागेचा
कुजका संस्कार
विषारी फुत्कार
निषेधार्ह
🚩
      -भरत यादव
      @bharat yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने