रक्त पिण्यातले वाटेकरी

रक्त पिण्यातले वाटेकरी

रक्त पिण्यातले वाटेकरी

हिटलर म्हणायचा,
ज्यूंच्या टोपीत षडयंत्र आहे
आणि हिटलरचे भक्ताड चालत चाललेल्या 
ज्यूंची टोपी ओरबाडून घेत असत.

हिटलर म्हणायचा,
ज्यूंच्या प्रार्थना हिंसक आहेत
आणि हिटलरचे भक्ताड तेव्हा कुठेही
प्रार्थना करीत असलेल्या ज्यूंना बडवत
असत.

हिटलर म्हणायचा,
ज्यूंच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा
आणि हिटलरचे भक्ताड तेव्हा ज्यूंचे ताट 
हिसकावून त्याच्यानेच त्यांच्यावर
वार करत असत.

हिटलर म्हणायचा,
ज्यूंपासून दूर राहायला हवे
आणि हिटलरचे भक्ताड तेव्हा रस्त्यांवरून 
जाणार्‍या ज्यूंवरती
दगड भिरकावत असत.

हिटलर म्हणायचा,
ज्यू हे अपवित्र आहेत
आणि हिटलरचे भक्ताड तेव्हा ज्यूंना पाहताच 
तोंड फिरवत  असत.

याप्रकारे हिटलरने आपल्या भक्ताडांना अमानवी हिंसक खेळात गुंतवून ठेवले आणि ज्यूंच्या 
आहार स्वातंत्र्य,धार्मिक स्वातंत्र्य,लेखन-वाचन,
रोजगार यांवर निर्बंध घातले.

हिटलर जेव्हा ज्यूंना मृत्यू शिबीराकडे घेऊन जात होता 
तेव्हा हिटलरचे भक्ताड हात उंचावून हिटलरला 
अभिवादन करत होते.

भक्ताड हे कधी समजू शकले नाही
की त्यांना हिटलरने साठ लाख ज्यूंच्या
रक्त पिण्यातले वाटेकरी बनवले होते.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

खून पीने के भागीदार

हिटलर कहता था
यहूदियों की टोपी में षडयंत्र है
और हिटलर के भक्त चलते हुए यहूदी की टोपी नोच लेते थे

हिटलर कहता था
यहूदियों की प्रार्थनाएं हिंसक हैं
और हिटलर के भक्त तब कहीं भी प्रार्थना करते यहूदियों को पीट देते थे

हिटलर कहता था
यहूदियों के खान-पान पर नजर रखो
और हिटलर भक्त तब यहूदियों की थाली छीन कर उसी से उन पर वार कर देते थे

हिटलर कहता था
यहूदियों से दूर रहना चाहिए
और हिटलर भक्त तब सड़कों पर चलते हुए यहूदियों पर पत्थर बरसाते थे

हिटलर कहता था 
यहूदी अपवित्र हैं 
और हिटलर के भक्त तब यहूदियों को देखते ही मुंह फेर लेते थे 

इस तरह हिटलर ने
अपने भक्तों को अमानवीय हिंसक खेल में उलझाए रखा 
और यहूदियों के फूड फ्रीडम, धार्मिक स्वतंत्रता, पढ़ाई-लिखाई, रोजगार पर रोक लगा दी

हिटलर जब यहूदियों को डेथ कैंप की ओर ले जा रहा था
तब हिटलर के भक्त हाथ उठकर हेल हिटलर बोल रहे थे 

भक्त यह कभी नहीं समझ पाए कि
उन्हें हिटलर ने 60 लाख यहूदियों का खून पीने में भागीदार बना दिया

©गुलज़ार हुसैन
Gulzar hussain

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने