'मराठी भाषादिन' विषयी डाॅ.आ.ह.साळुंखे यांची भूमिका

'मराठी भाषादिन' विषयी डाॅ.आ.ह.साळुंखे यांची भूमिका

'मराठी भाषा दिन'विषयी 
डॉ आ. ह.साळुंखे यांची भूमिका

मराठी भाषा दिन स्वामी चक्रधरांच्या चरित्राशी 
जोडायला हवा.
मला कुसुमाग्रज यांच्यविषयी नितांत आदर आहे .
त्यांच्या कविता वाचत वाचतच माझ्या साहित्याचे 
भरण-पोषण झाले. हे सगळे खरे असले तरी लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे ‌त्यामध्ये एक प्रकारे श्री चक्रधर स्वामींचे चरित्र आले आहे. हा ग्रंथ अनेक दृष्टींनी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच गेली अनेक वर्षे मी एक भूमिका मांडत आलो आहे. ती म्हणजे आपल्याला 'मराठी दिन' साजरा करायचाच असेल तर तो श्री चक्रधर स्वामींच्या चरित्राशी जोडलेला असावा.यात कुसुमाग्रजांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही ,ज्यांचे श्रेय त्यांनाच देणे उचित होय, असे मला वाटते. शिवाय संत नामदेव , संत चोखामेळा,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम इत्यादी नावेही महत्त्वाची आहेतच. अशा स्थितीत अगदी अलीकडच्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा करणे कदाचित स्वतः कुसुमाग्रजांनाही आवडले नसते.ही माझी भूमिका आहे.तुम्ही वेगळी भूमिका घ्यायला स्वतंत्र आहात.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने