दोन मल्याळम लघुकविता
१.
शिक्का
गोडसेला पोस्टात
नोकरी मिळाली
तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार
नाही उरला,त्याला वाटलं
आता मिळेल संधी रोजच
गांधींना बडवण्याची
धातूच्या जड शिक्क्याने.
२.
कुर्हाड
हिंदू कुर्हाड
म्हणाली मुस्लीम कुर्हाडीला
आपण जे रक्त चाखलं आहे आज
त्याची चव एकसारखीच होती.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
हिंदी अनुवाद
यादवेंद्र
Yadvendra
मुहर
गोडसे को मिली
नौकरी डाकघर में
तो वह खुशी से फूला न समाया
अब रोज रोज
मिलेगा मौका पीटने का
गांधी को
धातु की भारी मुहर से।
कुल्हाड़ी
हिन्दू कुल्हाड़ी
बोली मुस्लिम कुल्हाड़ी से :
खून जो हमने पिया आज
उसका स्वाद एक जैसा ही था।
(मलयालम से अमृत लाल के अंग्रेजी अनुवाद पर आधारित)
मूळ मल्याळम कविता
©कुरीप्पुजा श्रीकुमार