मेलेल्यांचा निवडणूक जाहीरनामा!

मेलेल्यांचा निवडणूक जाहीरनामा!

मेलेल्यांचा निवडणूक जाहीरनामा!

गंगेत वाहात चाललेल्या युवकाचे प्रेत
सांगते आहे,
आमची हत्या झालीये हो!

आॅक्सिजनविना तडफडून
मेलेल्या सगळ्या माता रडताहेत
या सरकारने आमचे श्वास हिरावून घेतलेत!
यांच्याहातून आवळला गेला आमचा गळा!

चितेच्या लाकडांसाठी रडणारे
एका आजोबांचे प्रेत विचारतेय
हे खूनी अजूनही शासनकर्ते आहेत?

वाळूत दफन केलेल्या युवकाचे प्रेत म्हणतेय,
मला अजून मरायचं नव्हतं
मी तर वरातीसाठी नवा पोशाख शिवलेला होता!

लक्षावधी बेवारस मुडदे एकाचवेळी बोलतायत
ज्या सरकारने आम्हाला मारले आम्ही सगळे त्याच्याविरूद्ध आहोत
शासकीय क्रौर्याला संपवणे यातच आमचा न्याय असेल!

औषधांविना मरण पावलेला एक सापळा बोलतोय
जर आमच्या मारेकर्‍यांना मत दिलेत तर, 
तुम्ही दिलेले पिंड आम्हाला मिळणार नाही.

पायी चालून चालून वाटेत मारला गेलेला मजूर म्हणतोय की जर या मारेकर्‍यांना निवडलेत तर
आम्हाला मोक्ष मिळणार नाही.

जर वध करणार्‍यांना पाठीशी घातले तर आम्ही युगेनयुगे भटकत राहू प्रेत बनून
जर घोषणाबाजांचे नाव घेतलेत तर
आम्ही हवेत निनादत राहू यांच्याविरूद्ध प्रेत बनून !

हाॅस्पिटलबाहेर मरण पावलेला एक शेतकरी बोलतो आहे,
आम्ही तुमचा धिक्कार करू जर तुम्ही मारेकर्‍यांपुढे वाकलात तर
आम्ही तुमचा धिक्कार करू तुम्ही मारेकर्‍यांच्या हाती विकले गेलात तर!

फुप्फुस वितळून गेले ज्या नवविवाहितेचे, 
ती रडते आहे
भेत्रटांच्या हातातून सोडवा राज्याला
भेत्रटांच्या जबड्यामधून काढा राज्याला!

रात्रीच्या अंधारात घोषणा देताहेत
कोरोनामध्ये मारले गेलेले लोक
गंगेत प्रेतांची मिरवणुक निघते आहे
गंगेच्या मैदानात छाती बडवून प्रत्येक प्रेत म्हणते आहे

आमची आठवण ठेवा
जसे आम्ही मारले गेलो 
जसे आम्ही झिडकारले गेलो
यांनाही दुर्लक्षून मारा
यांना झिडकारून द्या
या शब्दबंबाळ नाकर्त्यांनां 
गादीवरून खाली खेचा!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मृतकों का चुनाव घोषणा पत्र!

गंगा में बह रही युवक की लाश कह रही है
हमारी हत्या हुई।

ऑक्सीजन बिना तड़प कर 
मरी सारी माताएं रो रही हैं
इस सरकार ने हमारी सांसें छीन लीं!
इसके हाथों घोटा गया हमारा गला!

चिता की लकड़ी के लिए रोता 
एक दादा का शव पूछता है
ये हत्यारे अभी तक शासन में हैं?

रेत में दफनाया युवक का शव कहता है
मुझे अभी नहीं मरना था!
मैंने तो बारात के लिए नए जोड़े सिलवाए थे!

लाखों अनाथ मुर्दे एक साथ बोलते हैं
जिस सरकार ने हमें मारा हम उसके खिलाफ हैं
सरकारी क्रूरता को मिटाना ही हमारा इंसाफ है

दवा के बिना मारा गया एक कंकाल बोलता है
यदि हमारे हत्यारों को वोट दिया तो
हमें तुम्हारा दिया पिंड ना मिले।

पैदल चल चल कर रास्ते में मारा गया मजदूर बोलता है
यदि इन हत्यारों को चुना तो
हमें ना मिले मोक्ष!

यदि वधिकों का साथ दिया तो
हम युग युग तक भटकें प्रेत बन कर
यदि जुमलेबाजों का नाम लिया तो
हम हवा में गूजेंगे इनके खिलाफ प्रेत बन कर!

अस्पताल के बाहर मरा एक किसान बोलता है
हम तुमको धिक्कारेंगे तुम हत्यारों के आगे यदि झुके
हम तुमको धिक्कारेंगे तुम हत्यारों के हाथों यदि बिके!

फेफड़े गल गए जिस नव ब्याहता के वह रोती है
कायरों के हाथ से निकालो प्रदेश को
कायरों के जबड़े से निकालो प्रदेश को!

रातों के अंधियारे में नारा लगा रहे हैं
कोरोना में मारे गए लोग
गंगा में शवों का जुलूस निकल रहा है
गंगा के मैदान में छाती पीट कर हर शव कह रहा है

हमें याद रखना
जैसे हम मारे गए जैसे हम दुत्कारें गए
इनको भी उपेक्षा से मारो
इनको दुत्कारो
इन लफ्फाज निकम्मों को गद्दी से उतारो!

©बोधिसत्व
Bodhi Sattva 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने